-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी सोशल मीडियावर दिवाळी पाडव्यानिमित्त (Diwali Padwa 2025) खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अविनाश यांच्याबरोबर पत्नी सोनाली जाधवदेखील (Sonali Jadhav) आहे.
-
अविनाश व सोनाली यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त घरात खास फोटोशूट केले होते. सोनाली यांनी फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली होती.
-
अविनाश व सोनाली यांनी घराचे इंटिरिअर खूप सुंदर केले आहे.
-
सोनाली जाधव या व्यावसायिक (Entrepreneur) आहेत. त्यांचा प्रीमियम हार्वेस्ट बाईट्स या नावाने सेंद्रीय अन्न पदार्थांचा व्यवसाय असून त्या शैक्षणिक सल्लागार आहेत.
-
अविनाश यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.
-
अविनाश यांनी लोकसत्ताच्या गणपती विशेष मुलाखतीत त्यांच्या कॉलेजमधील प्रेम कहाणी बद्दल आणि त्यांच्या आईचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावण्याचे प्रयत्न याबद्दलचे किस्से सांगितले आहेत.
-
या मुलाखतीत अविनाश यांनी आपल्या मुलाच्या जन्मावेळी आपण तुरुंगात होतो, अशी आठवणही सांगितली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अविनाश जाधव/इन्स्टाग्राम)
Photos: अविनाश जाधव यांच्या घराची चर्चा; दिवाळी पाडव्यानिमित्त शेअर केले बायकोबरोबरचे फोटो
सोनाली यांनी दिवाळी पाडव्यासाठी फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली होती.
Web Title: Mns leader avinash jadhav wife sonali jadhav diwali padwa 2025 home tour interior photos viral sdn