Premium

आमदार रवींद्र धंगेकरांचे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, ललित पाटील प्रकरणात केली ‘ही’ मागणी

काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले आहेत.

pune mla ravindra dhangekar, ravindra dhangekar protest outside pune police commissioner office
आमदार रवींद्र धंगेकरांचे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, ललित पाटील प्रकरणात केली 'ही' मागणी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटनेला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी झाला. ज्या व्यक्तींनी ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केली त्या सर्वांवर कारवाई सुरू आहे. त्याच दरम्यान तत्कालिन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले. संजीव ठाकूर यांच्यावर ही कारवाई पुरेशी नसून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाला दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. ललित पाटीलकडून कोण कोणती साहित्य, रोख रक्कम किती जप्त केली आहे, याबाबत पोलिसांकडून माहिती दिली जात नाही. ज्या ससून रुग्णालयामधून ललित पाटील पळाला, त्यावेळचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त केले आहे. तर डॉ. देवकाते यांना बळीचा बकरा बनवत त्यांच्यावर कारवाई केली. काही पोलिस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. ललित पाटीलशी संबधित सर्वांवर कारवाई होते, पण तत्कालिन ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला.

हेही वाचा : लोणावळ्यात दरीतून चालण्याचा घ्या आनंद

तसेच ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात संजीव ठाकूर यांना राज्य सरकार आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी का वाचवित आहेत. यामागे नक्कीच मोठी व्यक्ती असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संजीव ठाकूर यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत आहोत. जोवर संजीव ठाकूर यांना अटक होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असल्याचे धंगेकरांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune mla ravindra dhangekar protest outside pune police commissioner office demand to arrest dr sanjeev thakur in lalit patil drug case svk 88 css

First published on: 29-11-2023 at 11:50 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा