महाराष्ट्रात नवं अजित पवार पर्व सुरू झालं आहे. नेहमीच इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते. काही वेळा नवीन इतिहास घडतो. हा इतिहास घडवण्याचं सामर्थ्य हे अजित पवार यांच्यात असल्याच म्हणत तटकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. सुनील तटकरे हे पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> “…ते पाप पृथ्वीराज चव्हाणांचे”, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा गंभीर आरोप

सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार यांनी केलेल्या विधानावर मी प्रतिक्रिया देणार नाही. पण काळ बदलत आहे. युवा आणि तरुण पिढी ही अजित पवार यांच्या पाठिशी आहे. नवीन काळात अजित पवार पर्व सुरू झालं आहे. मी ठामपणे सांगतो, नेहमीच इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते. काही वेळा नवीन इतिहास घडतो. तो नवीन इतिहास घडवण्याचं सामर्थ्य अजित पवार यांच्यात असल्याचं सुनील तटकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, आमच्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांची मान्यता असलेला पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणूकित आम्हाला यश नक्कीच मिळेल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.