ज्यांनी यापूर्वीच सत्तेत असताना पाकिस्तानाला भारताला जोडणे आवश्यक होते. त्यावेळी त्यांनी अशी कोणतीही कृती केली नाही. याऊलट तोडण्याचीच कामे केली. ते आता अखंड भारत जोडो अभियान राबवून भारताला जोडू पाहत आहेत. भारत देशाला जोडताना यांचा पक्ष तुटत चालला आहे. त्यामुळे काँग्रेसला पहिले आपली तुटणारी काँग्रेस जोडावी लागेल, अशी बोचरी टीका केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.
कल्याण मधील दुर्गाडी देवी, नवरात्रोत्सवांच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री पाटील शुक्रवारी रात्री शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवलीच्या होत असलेल्या बदनामीला वैतागले आमदार राजू पाटील, म्हणाले बाहेरच्यांनी लुडबुड…

एकीकडे काँग्रेसचे भारत जोडो अभियान सुरू आहे त्याच बरोबर दुसरी कडे अध्यक्ष पदावरुन काँग्रेस तुटण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसला एकावेळी दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. ज्या काँग्रेसने यापूर्वीच अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करणे गरजेचे होते. त्यावेळी त्यांनी तोडण्याची कामे केली. आता अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू आहे. पाचशे वर्षापूर्वी जो भारत होता, तो अखंड भारत आता पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आकाराला येत आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन जो घोळ सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसवर आता कोणाचा कंट्रोल राहिला नाही, अशी टीपणी मंत्री कपील पाटील यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister of state raj kapil patil criticized that the congress will have to join its disintegrating congress amy
First published on: 01-10-2022 at 19:23 IST