कल्याण, डोंबिवलीत कोणीही राजकीय नेता, अभिनेता, कलाकार आला की प्रथम तो आपल्या शहरातील घाणेरडेपणा, अस्वच्छता पाहून जाहीर व्यासपीठावरुन टीका करतो. हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे शहरांचे नेतृत्व हे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडेच असले पाहिजे, असे स्पष्ट करुन मनसे आ. प्रमोद पाटील यांनी प्रत्येक जण आपल्या शहराला येऊन नाव ठेवतोय यामध्ये किमान जनाची नाही तरी मनाची आपण आता ठेवली पाहिजे. शहर कसे असले पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे, अशी टीका आ. पाटील यांनी विकासाच्या नावाने बोंबा ठोकणाऱ्या प्रतिस्पर्धी मंडळींना लगावला.बाहेरच्यांनी आता तरी शहरातील वाढती लुडबुड थांबवावी, असे ते उपरोधिकपणे म्हणाले.

हेही वाचा >>> वादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या

कल्याण, डोंबिवलीतील नवरात्रोत्सव मंडळ, राजकीय मंडळींनी आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमांना दररोज संध्याकाळी सहा नंतर मुंबई, पुणे भागातील नाट्य, चित्रपट कलाकार डोंबिवली, कल्याण शहरात रस्ते मार्गाने येत आहेत. या मंडळींना कल्याण शिळफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्ता, कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर ही मंडळी ध्वनाीक्षेपक हातात घेऊन प्रथम दिलगिरी व्यक्त करत तुमच्या शहरातील वाहतूक कोंडीमुळे आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी उशिरा पोहचत आहोत, असे जाहीरपणे सांगत आहेत. हे ऐकून राजकीय आयोजकही खजील होत आहेत.गेल्या दोन दिवसांपासून अभिनेती आदिती सारंगधर, अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेत्री अश्विनी काळसेकर नवरात्रोत्सव कार्यक्रमांसाठी कल्याण, डोंबिवलीत येऊन गेले. त्यांनी ही कल्याण, डोंबिवलीत येण्यास आवडते पण या शहरातील वाहतूक कोंडी पाहून पुन्हा यावेसे वाटत नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >>> कल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी

अभिनेत्री आणि परीक्षक अश्विनी काळसेकर शुक्रवारी डोंबिवलीत एका नवरात्रोत्सव कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांना शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. बराच उशीर आपण वाहतूक कोंडीत अडकून पडलो होतो. आता दळणवळणांच्या सुविधांमुळे नागरिक आपल्या वाहनाने राज्याच्या विविध भागात वाहनाने प्रवास करतात. जागोजागी अशी कोंडी होणार असेल तर ते चुकीचे आहे. अशी कोंडी होत असेल तर त्याचा विचार झाला पाहिजे. शिळफाटा रस्त्यावर आम्ही अनुभवलेला प्रकार भयावहच होता, असे काळसेकर यांनी सांगितले.अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता संतोष जुवेकर यांनीही कल्याण मधील लोकसत्ताच्या कार्यक्रमात कल्याण, डोंबिवलीत येण्यास नेहमीच आवडते. पण या शहरात रस्ते मार्गाने जायाचे म्हटले की पोटात गोळा येतो. या शहरांमधील वाहतूक कोंडी हा भयावह प्रकार आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>ठाणे : तोतया पोलीस अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर आ. प्रमोद पाटील यांनी प्रत्येक नेता, कलाकार येऊन डोंबिवली, कल्याण मधील वाहतूक कोंडी, अस्वच्छतेवर नेहमीच टीका करत असतो. याचा आता कुठेतरी विचार होण्याची गरज आहे. फलक लावून हे प्रश्न सुटणारे नाहीत. हे प्रश्न तळमळीने मार्गी लावणे आवश्यक वाटत असेल तर बाहेरच्यांनी त्यात लुडबुड न करता स्थानिकांना शहराचे नेतृत्व करुन द्यावे, असे पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.