मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाली असल्याने उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटाने सुरु आहे. ठाणे ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway trains running late sgy