लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पश्चिमेतील गरीबाचापाडा भागात विकास आराखड्यातील पोहच रस्त्याच्या गल्लीमध्ये एक सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला वाहनतळाची सुविधा नसल्याने २७ सदनिका या असलेल्या इमारतीमधील सर्व वाहने मुख्य वर्दळीच्या, अंतर्गत रस्त्यावर उभी राहणार आहेत. यामुळे भविष्यात येथे वाहतूक कोंडी होणार आहे. परिसरातील अधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये या बेकायदा इमारतीमुळे अस्वस्थता पसरली आहे.
दोन महिन्यात हे काम पूर्ण करुन या बेकायदा इमारती मधील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्याची तयारी माफियांनी केली आहे. टिटवाळा ते हेदुटणे या २१ किमी लांबीच्या कल्याण
हेही वाचा… भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त दोघांना अटक
डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील गरीबाचापाडा येथे कोलते स्टोर जवळ, अंबर पार्क सोसायटी रस्ता, साई मंदिरा समोरील गल्ली याठिकाणी पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता प्रशांत पटेकर उर्फ लारा या भूमाफियाने सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या बेकायदा इमारतीमुळे गरीबाचापाडा विकास आराखड्यातील १८ मीटरचा रस्ता, अंतर्गत गल्ली मधील पोहच रस्ता बाधित होत आहे. मोक्याच्या जागेत, अंतर्गत गल्लीतील रस्ता, पदपथाला बाधा येईल अशा पध्दतीने या इमारतीचे बांधकाम केल्याने कोलते स्टोर परिसरातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे.
हेही वाचा… बदलापूरच्या कचराभूमीला आग, आसपासच्या परिसरात धुराचे साम्राज्य
एका जागरुक रहिवाशाने नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त सुधाकर जगताप, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांना भूमाफिया प्रशांत पटेकर यांच्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची तक्रार केली आहे. बेकायदा इमारतीमधील सदनिकांची २५ लाखांच्यापुढे विक्री केली जात आहे. भूमाफिया बनावट कागदपत्र तयार करुन त्याद्वारे इमारत अधिकृत असल्याचे दाखवून घर खरेदीदारांची फसवणुक करित आहेत. कोलते स्टोअर जवळील इमारती मधील सदनिकांची विक्री करण्याची घाई माफियाने चालवली आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा… कल्याणमध्ये रिक्षाच्या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी
दरम्यान, देवीचापाडा काळुबाई मंदिरा जवळील मुकेश म्हात्रे, जितू म्हात्रे यांच्या बेकायदा इमारतीवर कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. आयुक्तांनी ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त सुधाकर जगताप यांनी या बेकायदा इमारतीची पाहणी केली आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal building in dombivli obstruct traffic dvr