बदलापूरः अंबरनाथ आणि बदलापूरसह उल्हासनगर शहरासाठी संयुक्तपणे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र ज्या भूमीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे, त्या बदलापूर शहराच्या कचराभूमीवर सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. येथील कचरा पेटत असल्याने आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरतात. मात्र नागरी वस्ती जवळ नसल्याने पालिकेचे फावते आहे. शहरापासून दूर असल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी पेटवून देण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होतो आहे.

बदलापूर शहराचा कचरा शहरातून उचलून शहरातील नागरी वस्तीपासून दूर असलेल्या एका दगडाच्या खदान वजा जमिनीवर टाकला जातो. नागरी वसाहत या कचराभूमीपासून दूर आहे. त्यामुळे कचराभूमीचा थेट त्रास होत असल्याच्या तक्रारी कमी आहेत. कचराभूमीला आग लागल्यास त्याचा त्रास नविन वडवली, साई वालिवली गावातील ग्रामस्थांना होतो. याच कचराभूमीवर अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. अंबरनाथ शहरासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. पालिकेची अस्तित्वात असलेली कचराभूमी नागरिकांच्या डोक्याला ताप ठरली आहे.

illegal building, Kopar Shivsena branch,
डोंबिवलीतील कोपर शिवसेना शाखेजवळ बेकायदा इमारतीचे बांधकाम, व्यापारी गाळे बांधून विक्रीची तयारी
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

हेही वाचा >>> कल्याणमध्ये रिक्षाच्या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

मात्र आता ज्या भूमीवर संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे. त्या कचराभूमीला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आग लागत असल्याचे समोर आले आहे. या आगीमुळे नविन वडवली आणि साई वालिवली गावात धुराचे लोट पसरत असल्याचे दिसून आले आहे. या कचराभूमीच्या शेजारी दगडांची खाण असून तेथे स्फोट होत असतात. त्यामुळे येथे उडणारी धुळ आणि कचराभूमीचा धुर सहजासहजी दिसून येत नाही. मात्र कचराभूमीच्या धुरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या कचराभूमीतून धुर निघत असून कचराभूमी धुमसत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. त्यामुळे ज्या आगीच्या प्रश्नामुळे अंबरनाथमध्ये नागरिकांमध्ये संताप आहे. त्याच समस्येने बदलापुरच्या कचराभूमीला ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा पेटतो की पेटवला जातो असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तसेच जर कचरा पेटवला जात असेल किंवा पेटत असेल तर कचरा प्रक्रियेचे काय असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

वाढत्या उष्णतेमुळे कचराभूमीला आग लागण्याची शक्यता आहे. कचराभूमीवर उष्णतेमुळे वायू तयार होत असतो. तसेच काही व्यक्तीही आग लावत असल्याचाही संशय आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी भूभराव करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून दोन कोटींचा प्रस्ताव आहे. -योगेश गोडस मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.