आई आणि बाळाचं नातं अत्यंत निर्मळ असते जेवढं प्रेम एखादी आई आपल्या पिल्लावर करते तेवढे क्वचितच दुसरे कोणी करत असेल. आपण अनेकदा पाहिले असेल की एखादी आईल आपल्या लेकराचां जीव वाचवण्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करते. पण एखादे पिल्लू आपल्या आईसाठी कोणत्याही संकटाशी भिडताना पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की बघा.

पण, सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आई नाही तर चक्क एक मुलं आपल्या आईच्या जीवाचे रक्षण करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका म्हशीचे रेडकू आपल्या आईला वाचवण्यासाठी एका भल्या मोठ्या हत्तीशी लढताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेडकू कशाप्रकारे बेधडकपणे हत्तीच्या दिशेने धावत सुटले आहे. म्हशीच्या पिल्ला आपल्याकडे रागात येताना पाहून भल्ला मोठा हत्ती देखील उटल्या पावली धावू लागतो. रेडुकाच्या मागे त्याची आईही धावत आहे. शेवटी हत्ती रेडकूच्या पिल्लाच्या रस्त्यातून बाजूला होते आणि तेथून पळ काढतो.

हेही वाचा – गर-गर, गर-गर, गर…फिरत शक्तिमानसारखे नाचू लागले वधूचे मामा अन् काका, डान्स पाहून आवरणार नाही हसू, Video Viral

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ X वर @AMAZlNGNATURE नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ६५०.८ के वेळा पाहिला गेला असून त्याला ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत.
एकाने कमेंटमध्ये लिहिले,”हत्ती हे आतापर्यंतचे सर्वात छान प्राणी आहेत, ते इतर कोणत्याही प्राण्याला मारू शकतात, परंतु ते नेहमी शांत राहतात आणि दया दाखवतात.”

हेही वाचा – दाढी-मिशी काढून वडीलांना सरप्राईज देणे पडले महागात! संतापलेल्या काकांनी पाहताक्षणी मुलाला धू धू धुतला, पाहा Viral Video

दुसऱ्याने लिहिले की, हत्ती जरी खूप मोठा असला तरी तो लहान रेडकूला हानी पोहचवू इच्छित नाही. लहान म्हैसही आपल्या आईला वाचवण्यासाठी खूप धाडसी आहे”

तिसऱ्याने लिहिले,”आपला हा आकार नाही तर धैर्य महत्त्वाचे आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे”

चौथ्याने लिहिले “त्याला म्हणतात कुटुंब आणि परवानगीशिवाय कोणीही कुटुंबाला हात लावला नाही. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही”