Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील होताना आपण पाहतो. प्राण्यांच्या व्हायरल व्हिडीओंमध्ये कधी काही पाळीव प्राणी इतर प्राण्यांसह किंवा एखाद्या व्यक्तींबरोबर खेळताना दिसतात; तर कधी प्राणी भांडण करतानाही दिसतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असं काहीतरी पाहायला मिळत आहे; जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मांजर आणि श्वान अनेकांचे आवडते प्राणी असतात. या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाते. कित्येक जण त्यांच्यासाठी विशेष अन्न, झोपण्यासाठी स्पेशल अंथरूण आदींची व्यवस्था करतात. अनेकदा त्यांना कंटाळा आला की कार्टून, गाणी आदींद्वारे त्यांचे मनोरंजन करण्याचाही प्रयत्न केला जातो. या पाळीव प्राण्यांचे लाड पाहून अनेकांना त्यांचा हेवाही वाटतो. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील एक मांजर असं काहीतरी करतेय; जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? Viral Video

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरस्त्यात एक मांजर निवांत बसलेली दिसत आहे. यावेळी रस्त्यावरून बऱ्याच गाड्यादेखील ये-जा करीत आहेत. गाड्यांना पाहूनही मांजर जागेवर उठत नाही. मांजरीला रस्त्यावर बसलेलं पाहून एक बसचालक बस थांबवतो आणि ती बाजूला होण्याची वाट पाहतो. पण, यावेळी मांजर उठून बसच्या चाकापुढे जाऊन झोपते. मांजर आत्महत्येसारखी कृती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून एक व्यक्ती तिला बाजूला खेचते. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून, मांजरीला तिचा जीव नकोसा झाला असल्याची शंका अनेक जण व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा: नाद खुळा! भारतीय गाण्यावर परदेशी चिमुकल्याचे जबरदस्त ठुमके; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jabalpuriya_masti_me_raho या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करीत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)

एका युजरनं लिहिलंय की, प्रत्येक जण आयुष्याला वैतागलेला आहे. दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, “माणूसच नाही प्राणीदेखील आपल्या आयुष्यात हरलेले आहेत”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, “सर्वांच्या आयुष्यात दुःख आहे”. आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय की, “मला खूप वाईट वाटलं हे पाहून”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cat is trying to commit suicide on road watching viral video will shock you sap