Ias officer shares viral video of jugad irrigation technique netizens dislike this concept know the reason | आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण | Loksatta

आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण

या Viral Video मध्ये शेतात पिकावर सिंचन करण्यासाठी जुगाड करून तयार केलेली एक ट्रेडमिलसारखी मशीन आणि त्यावर बैल चालताना दिसत आहे.

आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण
Photo : Social Media

जुगाड करण्यात भारतीयांसारख्या भन्नाट कल्पना कुठेच दिसणार नाहीत. भारतीयांचे असे अनोखे जुगाड करणारे अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतात पाणी फवारणी करण्यासाठी शेतकऱ्याने शक्कल लढवून एक ट्रेडमिलसारखी मशीन बनवली आहे आणि त्यावर बैल चालताना दिसत आहे, ज्यामुळे शेतातील पिकाला पाणी पुरवले जात आहे. सिंचन करण्यासाठी वापरण्यात येणारी ही जुगाडू पद्धत अचंबित करणारी आहे. पण अनेक नेटकऱ्यांना ही संकल्पना पटली नसल्याचे या व्हिडीओवरील कमेंटवरून दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओला ‘ग्रामीण भारतातील नवे आश्चर्यकारक संशोधन’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत १ लाख ५४ हजार जणांनी पाहिला आहे. शेतात पाणी उपासण्यासाठी वीजेऐवजी जनावरांचा वापर करण्याची ही कल्पना अनेकांना पटली नाही. मुक्या जनावरांना अशाप्रकारे त्रास दिल्याबद्दल अनेक नेतकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत या व्हिडीओवर टीका केली आहे. पाहूया हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

आणखी वाचा : ‘साथी हात बढाना…’ मातीचे भांडे बनवतानाचा मांजरीचा हा भन्नाट Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : हत्तीला कधी डान्स करताना पाहिलंय? हा गोंडस व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

आणखी वाचा : ऐकावे ते नवलच! घरात व्हिडीओ गेम खेळत असताना त्याच्या अंगावर पडली वीज अन्…

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या अचंबित करणाऱ्या युक्तीची काही जण प्रशंसा करत आहेत तर अनेक जण यावर यामुळे मुक्या जनावरांना त्रास होत असल्याबद्दल टीका करत आहेत. या व्हिडीओवरून इंटरनेटवर दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2022 at 10:32 IST
Next Story
Roger Federer Video : भरल्या डोळ्यांनी रॉजर फेडररला भावनिक निरोप; राफेल नदाललाही अश्रू आवरणे कठीण