scorecardresearch

Viral Video : हत्तीला कधी डान्स करताना पाहिलंय? हा गोंडस व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा हत्ती एका लहान मुलीच्या डान्सची नक्कल करत आहे.

elephant Viral Video
Photo : Social Media

कधी कच्चा बादाम तर कधी सामे गाण्यावरील लहान मुलांचा डान्स, कधी ‘पुष्पा’सारखा एखाद्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग अशा बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यात प्राण्यांचे देखील अनेक व्हिडीओ असतात. रोजच्या कामाच्या टेन्शनमध्ये प्रत्येक व्यक्तीचे थोडे मनोरंजन व्हावे यासाठी असे व्हिडिओ अधिकाधिक शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बलाढ्य आकार असणारा हत्ती चक्क डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या एका हत्तीचा गोंडस डान्स व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या हत्तीसमोर एक लहान मुलगी डान्स करताना दिसत आहे. ती मुलगी डान्सची एक स्टेप करून थांबते आणि लगेच हत्ती तीची नक्कल करतो. हत्तीची ही गोंडस नक्कल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशु काब्रा यांनी शेअर केला आहे. ‘यांच्यापैकी (मुलगी आणि हत्ती) कोणी उत्तम डान्स केला?’ असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : काळ आला होता पण…; निष्काळजीपणामुळे काय होऊ शकते हे दाखवणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

लहान मुलीच्या डान्सची हत्तीने केलेली ही गोंडस नक्कल नेटकऱ्यांना आवडली आहे. अनेकजणांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांची पसंती दर्शवली आहे. पाहूया काही नेटकऱ्यांची प्रतिक्रिया.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया :

आणखी वाचा : शर्यतीच्या सुरूवातीलाच ती अडखळली पण…; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच

आणखी वाचा : या लहान बहीण भावाच्या जोडीची नेटकऱ्यांना पडली भुरळ! Viral Video एकदा पाहाच

या व्हिडीओतील हत्तीच्या डान्सने नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2022 at 10:36 IST

संबंधित बातम्या