Viral Photo : तुम्ही सरकारच्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना विषयी ऐकले असेल पण तुम्ही ‘लाडकी सुनबाई योजना’ विषयी ऐकले का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘लाडकी सुनबाई योजना’ ही कधी आली? खरं तर लाडकी सुनबाई योजना ही सरकारची योजना नसून एका हॉटेलची योजना आहे. होय, सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथील हॉटेल राजवाडा पार्क येथे हे ‘लाडकी सुनबाई योजना’ राबवली जात आहे. या हॉटेलने याचे बॅनर सुद्धा छापले आहे. सध्या या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (ladki sunbai yojana pune Baramati banner goes viral watch viral Photo)
सासुबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री, लाडकी सुनबाई योजना!
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की एका ऑटो रिक्षाच्या मागच्या बाजूला हे बॅनर बांधले आहे. आणि या बॅनर वर लिहिलेय, “हॉटेल राजवाडा पार्क, ‘लाडकी सुनबाई योजना’ सासुबाई च्या जेवणावर सुनबाई चे जेवण फ्री.
आवश्यक गोष्टी
१. सासूबाईला जेवायला घेऊन येणे आवश्यक आहे
२. सासुबाईंना जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईंना फ्री मिळणार
३. कमीत कमी घरामधील पाच लोकांना जेवायला आणणे.
ह्या बॅनर खाली पत्ता सुद्धा दिला. भिगवन रोड, टाटा मोटर्स समोर, श्रीनाथ ट्रान्सपोर्ट शेजारी बारामती.
प्रोप्रा. आनंद संजय सावंत
तुम्ही आजवर अनेक जाहीराती, बॅनर पाहिले असेल पण असे बॅनर पहिल्यांदा पाहत असाल. सध्या बारामतीमध्ये या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. जास्तीत जास्त लोकांनी हॉटेल राजवाडा पार्कला भेट द्यावी, त्यासाठी ही ऑफर दिली जात आहे.
बारामतीचे बॅनर चर्चेत, पाहा फोटो
pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हेच बघायचं राहिलं होतं. टॅग करा सासू सुनेच्या जोडीला.”
या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “म्हणजे पाच थाळींवर एक थाळी फ्री” तर काही युजर्सने हसण्याची इमोजी शेअर केले आहेत.
हेही वाचा : आई ही आई असते! बिबट्याचे पिल्लू एका विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई करतेय लोकांजवळ विनवणी, Video Viral
पुणे आणि पुणे जिल्ह्यात कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या या बॅनर आणि या हॉटेलच्या योजनेविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. ग्राहक वाढवण्यासाठी या खास योजनेचा वापर करण्यात आला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd