Lalbaugcha Raja Video: सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मुख्य शहरांमध्येही सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात बऱ्याचदा बाप्पाचे सुंदर व्हिडीओ, डेकोरेशन पाहायला मिळते; तर कधी गणपती पाहायला आलेल्या भाविकांमध्ये राडा झालेला पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात मुंबईतील एका प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक तारेवरची कसरत करत असल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत गणोशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईतील प्रसिद्ध मंडळांचे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक भेट देतात. भाविकांच्या उपस्थितीमुळे बऱ्याचदा खूप गर्दी पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात भाविक अक्षरशः बाप्पाच्या दर्शनासाठी कसरत करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये नक्की काय घडलं?

हा व्हायरल व्हिडीओ लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचा असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असलेले भाविक श्वास गुदमरेल अशा गर्दीतूनही जाण्यासाठी आतुर झाले आहेत. बराच वेळ थांबल्यानंतर मोजक्या लोकांना एका छोट्या गेटमधून आतमध्ये सोडलं जात आहे. लालबागमधील ही गर्दी पाहून नेटकरीही तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @food.therapy08 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच नेटकरीही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: आली गवर आली…सोनपावली आली! चिमुकलीने गायलं गौराईसाठी गाणं, VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘लोक घरातल्या बाप्पाचे दर्शन करायला रडतात आणि लालबागला जाऊन स्टोरी टाकून शोऑफ करतात’; तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘काय गरज आहे एवढ्या गर्दीत जायची.’ तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप वर्ष झाले… आता तरी सुधारले पाहिजे.. अशा गर्दी आणि चेंगरा चेंगरीत जाऊन बप्पा पावतो का? सिद्धपीठ आणि अष्टविनायक दर्शन व मानाचे प्राचीन काळातील गणपती या ठिकाणी जावे या दिवसात.” तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “मनी नाही भाव देवा मला पाव.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalbaugcha raja devotees rush to see the lalbaugcha raja after watching the video the netizens express anger sap