laundry store offers free service to unemployed : नोकरी किंवा बिझनेस प्रत्येकाच्या आयुष्यातील हा महत्वाचा भाग आहे. बिझनेसमध्ये आपण कसे दिसतो, कसे राहतो या गोष्टींना इतके महत्व नसते. पण नोकरीमध्ये या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात. यामुळेच ‘फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन’ असे उगीच नाही म्हणत.कोणत्याही जॉबच्या इंटरव्ह्यूला जाताना चांगले कपडे घालून जाणे खूप महत्वाचे आहे. पण अनेकजण वेळेअभावी किंवा काही कारणास्तव इंटव्ह्यूला चांगले कपडे घालून पोहचू शकत नाही. अशा लोकांसाठी अमेरिकेतील एका लॉन्ड्री स्टोअरने एक भन्नाट ऑफर आणली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी ही अनोखी ऑफर देण्यात आली आहे. जे अजूनही नोकरी शोधत आहेत त्यांना हे लॉन्ड्री स्टोअर मोफत सेवा देते. बेरोजगारांना मोफत सेवा देऊन ही लॉन्ड्री कंपनी लोकांची मने जिंकत आहे. आर्चर क्लीनर्स असे या कंपनीचे नाव असून तिने ओक्लाहोमामध्ये हा उपक्रम सुरू केला. या लॉन्ड्री स्टोअरने त्यांच्या स्टोअरबाहेरील एका खिडकीवर एक पोस्टर लावले आहे. ज्या पोस्टरचा फोटो गुड न्यूज मूव्हमेंटने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

बेरोजगारांना धुवून मिळणार मोफत कपडे

लॉन्ड्री व्यावसायिकाने लिहिले की, जर तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला इंटव्ह्यूला जाण्यासाठी कपडे स्वच्छ करुन हवे असतील तर आम्ही ते मोफत करु देऊ. स्टोअरचे टीम लीडर, कोल्टन आर्चर यांनी पोस्टवर बेरोजगारांसाठी एक चांगला कोट लिहिला आहे की, जेव्हा कठीण वेळ असेल तेव्हा आम्ही तुम्हाला सर्वोत्तम दिसण्यात मदत करू. द गुड न्यूज मूव्हमेंटने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मानवता: दयाळूपणाने जग जिंकता येते. लोकांना एकत्र आणल्याबद्दल आर्चर क्लीनर्सचे आभार. आर्चर क्लीनर्सची ओक्लाहोमामध्ये त्यांच्या व्यवसायाला मदत करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.’

पोस्टर युजर्सच्या एकपेक्षा एक कमेंट्स

या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, माझा मानवतेवर विश्वास आहे. दुसऱ्याने लिहिले की, आमच्या शेजारचे सफाई कर्मचारीही असे करतात. तर तिसऱ्याने लिहिले की, ज्यांना मदतीची जास्त गरज असते तेव्हा त्यांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laundry store offers free service to unemployed people for interview netizens applaud sjr