आज दसरा हा सण आहे. दसऱ्यानिमित्त घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून दारावर लावण्यात येते. तसेच पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र काढून, घरातील स्त्रिया सोने, लहान मुले, तरुण मंडळी वह्या-पुस्तके, नोकरी करणारे त्यांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा घरातील अवजारे आदी सर्व मांडून त्यांच्याकडून पूजा केली जातात आणि आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात. तर आज मुंबई पोलिसांनीसुद्धा दोन पोस्ट शेअर करून, दसऱ्याच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आपण पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र रेखाटतो, त्याप्रमाणे चित्र रेखाटले आहे. तसेच विशेष म्हणजे सरस्वती काढल्यानंतर १५ त्रिकोण दिसत आहेत. त्या प्रत्येक त्रिकोणात एक-एक वाहतुकीचे चिन्ह चित्रित केले आहे.या चिन्हांमध्ये शाळा/विद्यालय, अरुंद रस्ता, पादचारी ओलांडणे, अरुंद पूल, असमान रस्ता, ट्रॅफिक सिग्नल किंवा वाहतूक संकेत, रस्त्याचे काम सुरू, उजवीकडे वळा, काटकोनी जोडरस्ता, निसरडा रस्ता, डावीकडे यू टर्न, धोकादायक खोल रस्ता, उभा चढ आदी चिन्हांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या या दसऱ्याच्या शुभेच्छा एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून नक्की बघा.

हेही वाचा… Video: जपानी तरुणीने स्वीकारले नवरात्री चॅलेंज! नऊ दिवस सादर केला दांडिया अन् गरबा

पोस्ट नक्की बघा :

दसऱ्यानिमित्त दिल्या खास शुभेच्छा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सरस्वती काढून, त्यात खास पद्धतीने वाहतुकीची चिन्हे चित्रित करण्यात आली आहेत आणि “सुरक्षित प्रवास करण्याचे ज्ञान” असा संदेश या चित्रांद्वारे देण्यात आला आहे. तसेच हा खास व्हिडीओ पोस्ट करून, “या विजयादशमीनिमित्त वाहतुकीच्या नियमांचे पालन करू, असा निर्धार करा आणि सुजाण नागरिक व्हा. दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा” अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. तसेच त्यांनी एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. त्यात १०० हा पोलिसांचा अधिकृत नंबर लिहिला आहे. त्यांनी एक हा अंक लिहून पुढे दोन शून्य या अंकाच्या जागी झेंडूची दोन फुले चित्रित करण्यात आली आहेत.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत @mumbaipolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या पोस्ट शेअर केल्या आहेत.वाहतूक चिन्हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रवास करताना या चिन्हांचे महत्त्व आणि वाहतुकीचे नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळोवेळी या गोष्टीची मुंबई पोलिस त्यांच्या हटके पद्धतीने प्रवासी आणि नागरिकांना आठवण करून देत असतात. आज त्यांनी दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने अशा अनोख्या आणि खास शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या आणि वेळोवेळी नियमांची आठवण करून देणाऱ्या मुंबई पोलिसांना आपणसुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ या…

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police gave special wishes on the occasion of dussehra and gave message to citizens asp