बंगळुरूमधील ट्रॅफिक पोलिस दररोज सकाळी नियम तोडणाऱ्या चालकांना रोखण्यासाठी, दंड आकारण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी रस्त्यावर उतरतात. ट्रॅफिक पोलिस सहसा अशा ठिकाणी मुक्काम मांडतात जेथे सगळ्यात जास्त वाहनचालक नियमांचे अधिक उल्लंघन करतात आणि पोलिसांशी वाद घालताना दिसतात. तर काही अज्ञात लोकांनी ट्रॅफिक पोलीस आहे हे सांगण्याकरिता गूगल मॅपवर लोकेशन चिन्हांकित (मार्क) केले आहे, असा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरू मंदगड्डे एक्स (ट्विटर) युजर @kiraataka_2 ने गूगल मॅप्सचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गूगल मॅपवर फक्त 'पोलिस इर्ट' टाईप करा आणि नंतर मला धन्यवाद म्हणा. कारण- तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता की, सर्चमध्ये 'येथे पोलीस असतात', 'बघा आणि जा', असे स्थान निश्चित करीत नागरिकांना सावध केले आहे. कारण- जेथे एकेरी रस्ते आहेत आणि जेथे लोकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते, अशा ठिकाणी कारवाई केली जाते. अशी किमान १० लोकेशन्स तुम्हाला या स्क्रीनशॉटमध्ये दिसून येतील. म्हणजेच ही ठिकाणे मॅपवर दर्शविण्यात आली आहेत. हेही वाचा…VIDEO: प्राणीसंग्रहालयात पडला चिमुकल्याचा शूज; हत्तीने सोंडेने उचलून दिला अन्… कर्मचाऱ्यांनी हत्तीला दिलं ‘हे’ बक्षीस पोस्ट नक्की बघा… ट्रॅफिक पोलिसांकडून दररोज ठरावीक ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकी चालवणे. वाहन परवाना, ट्रिपल सीट आदींबाबत वाहनचालकांची तपासणी करून, त्यात दोषी आढळणाऱ्या चालकांवर दंड ठोठावला जातो. व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, गुरू मंदगड्डे नावाच्या युजरने स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की, गूगल मॅपवर फक्त 'पोलिस इर्ट' टाईप करा. त्यानंतर तुम्हाला किमान १० अशी लोकेशन्स दिसतील; जिथे ट्रॅफिक पोलीस उभे आहेत. हेल्मेट किंवा लायसन्सशिवाय, तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती त्या दिशेने प्रवास करीत असल्यास, गूगल मॅपवर दाखविलेले ते लोकेशन लक्षात घेऊन, प्रवासासाठी दुसरा मार्ग निवडू शकतात. सोशल मीडियावर ही पोस्ट @kiraataka_2 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. एका वापरकर्त्याने या पोस्टच्या कमेंटमध्ये 'मला NYC मधील Uber ड्रायव्हर्सच्या फोनवर एक ॲप पाहिल्याचे आठवते; ज्याने त्यांना पोलिस कारच्या स्थानांबद्दल अलर्ट केले होते'. तसेच जरी ही कल्पना मजेदार दिसत असली तरी यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहनचालकांचा पोलिसांपासून बचाव होईल. "कृपया तुमचे हेल्मेट घाला, पोलिस येथे असतील" असे गूगल मॅप्सवर दाखविले जाते आहे हे पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.