Viral Video: प्राणी व माणूस यांच्यातील नातं हे जगावेगळं आहे. माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. काही जण जंगलातील प्राण्यांना बघायला नॅशनल पार्क, राणीच्या बागेत जातात. अनेक जण घरात प्राण्यांना पाळतात, तर काहींना रस्त्यावर भटक्या प्राण्यांना बिस्कीटे, दूध खाऊ घालतात. हे पाहून, आपल्याला माणसांपासून धोका नाही हे लक्षात घेऊन प्राणी सुद्धा प्रेमाची भावना समजून घेताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्राणीसंग्रहालयात आलेल्या चिमुकल्याचा शूज हत्तीने परत केला आहे.

व्हायरल व्हिडीओ चीनचा आहे. चीनच्या प्राणीसंग्रहालयातील एका हृदयस्पर्शी गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका २५ वर्षीय हत्तीने आपल्या दयाळू कृतीने एका चिमुकल्या पर्यटकाचे मन जिंकल आहे. चिमुकला त्याच्या कुटुंबाबरोबर प्राणीसंग्रहालयात जंगलातील प्राणी बघण्यासाठी आला होता. सुरक्षित अंतरावर उभा राहून चिमुकला त्यांच्या आई-वडिलांबरोबर हत्ती या प्राण्याला बघत होता. बघता बघता चिमुकल्याचे स्वतःचा बूट काढून पलीकडे हत्तीच्या परिसरात टाकला. हे पाहून हत्ती काय करतो व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…होंडा अमेझने महिलेच्या SUV ला दिली जोरदार धडक, महिंद्रा थार थेट विजेच्या खांबावर; VIDEO तून पाहा नाट्यमय प्रकरण

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हत्तीच्या लक्षात येतं चिमुकल्याने त्याची एक चप्पल वा बूट काढून हत्तीच्या परिसरात टाकला. हत्ती देखील हुश्शार… त्याने देखील आपल्या पायाजवळ पडलेल्या चिमुकल्याचा बूट अलगद आपल्या सोंडेने पकडला. हळूवारपणे आपली सोंड चिमुकल्याकडे फिरवून त्याच्या हातात दिला. तसेच या खास प्रसंगानंतर कर्मचाऱ्याने नमूद केले की, हत्तीने चिमुकल्याला मदत केल्याबद्दल ‘माउंटन रेंज’ हत्तीला अतिरिक्त जेवण दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @readersdigest या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘चिमुकल्याचा शूज हत्तीने परत केला’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, या हत्तीचे नाव ‘माउंटन रेंज’ आहे व तो २५ वर्षांचा आहे. तसेच हत्ती प्राणीसंग्रहालयातील पर्यटकांच्या लाडका आहे. एकूणच पर्यटकांच्या लाडक्या हत्तीने आज सोशल मीडियावर सगळ्यांचे मन जिंकले आहे.