Small Girl Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एका चिमुकलीचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात तिने असं काहीतरी केलंय, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान मुलं खूप निरागस असतात. पण, ते कधी काय करामत करतील हे कोणीही सांगू शकत नाही. आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल? याची कल्पना त्यांना नसते. त्यामुळेच अनेकदा आई-वडिलांच्या नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. काही गोष्टी आपल्यापैकी अनेकांबरोबर घडल्या असतील; ज्यात कधी नकळत तोंडात पैसे घालणे, तर कधी खाण्यायोग्य नसलेल्या गोष्टी आई-वडिलांच्या नकळत खाणे, अशा अनेक गोष्ट आहेत. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकलीने स्वतःचं डोकं एका लोखंडी गेटमध्ये अडकवलेलं दिसत आहे.

काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली खेळता-खेळता एका लोखंडी गेटमध्ये स्वतःचं डोकं घालते. पण, तिचं डोकं त्या गेटच्या सळीमध्ये अडकतं. शेवटी ती सळी कापण्यात येते. या चिमुकलीची ही करामत पाहण्यासाठी आजूबाजूचे लोकही गोळा होतात. सळी कापल्यानंतर चिमुकलीचं डोकं व्यवस्थित बाहेर काढलं जातं. त्यानंतर तिची आजी तिला ओरडते. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून अशा घटना अनेकदा गमतीशीर जरी वाटत असल्या तरी यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @509people या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत लाखों व्ह्यूज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: श्वानाचा नादखुळा डान्स! मालकाच्या खांद्यावर बसून डीजेच्या तालावर धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर Click करा

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “अरे बापरे खूपच करामती मुलगी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “माझी मुलही अशीच आहेत.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “ही तिथे अडकलीच कशी?” तर आणखी एकाने श्वानाला नाचवल्यामुळे संताप व्यक्त केला आहे त्याने लिहिलेय, “एवढं होऊनही रडत नाही ही खूपच धाडसी मुलगी आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small girl stuck his head in the iron gate user also speechless watching this video sap