Viral Photo: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पूर्वी सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचीदेखील खूप चर्चा असायची. त्यावरील विनोदी आशय नेहमी व्हायरल व्हायचे. परंतु, अलीकडे शाळेतील मुलांच्या पेपरातील उत्तरं, पोस्टर हातात घेऊन सल्ले देणाऱ्या मुलांचे व्हिडीओ, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉग, तसेच अतरंगी जाहिरातीचे पोस्टरही तितकेच चर्चेत असतात. अशातच आता एका जाहिरातीचा फोटो समोर आला आहे; तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल लोक घर, शिक्षण किंवा गाडी यांसाठी घेतलेले कर्ज हप्त्याने फेडतात. पण, तुम्ही कधी विवाह मंगल कार्यालयात केलेल्या लग्नाचे पैसे हप्त्याने फेडल्याचे ऐकलेय का? सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोद्वारे अशीच हटके जाहिरात केल्याचे दिसत आहे; जी पाहून युजर्सही हसून लोटपोट झाले आहेत.

या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्याच्या कडेला लावलेल्या जाहिरातीच्या पोस्टरवर, “लग्न करा आज, पैसे द्या हप्त्याने, EMI सुविधा उपलब्ध” असे लिहिण्यात आले आहे. ही अनोखी जगावेगळी जाहिरात वाचून प्रत्येक जण चक्रावून गेला आहे. या जाहिरातीचा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने खाली कॅप्शनमध्ये ‘हप्ते थकल्यावर बायको जप्त’ असे लिहिले आहे. ही एका मंगल कार्यालयाची जाहिरात असून, त्यावरील जाहिरातीवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हायरल फोटो इन्स्टाग्रामवरील @ag_creation_004 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि एक हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यावर एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “अरे, वा ही स्कीम पहिल्यांदा पाहिली.” दुसऱ्याने लिहिलेय, “हेच बघायचं राहिलं होतं.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हप्ता नाही भरला, तर काय करणार?”

हेही वाचा: शिक्षक नंबरी, विद्यार्थी दस नंबरी; शाळेतल्या विद्यार्थ्याने लिहिलेलं हे उत्तर कुठेही वाचलं नसेल; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक जाहिरातींचे फोटो व्हायरल झाले आहेत; ज्यात लोक नेहमी अतरंगी पद्धतीने जाहिरात करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका पत्रिकेत एका मुलाने चक्क स्वतःच्या लग्नासाठी एक जाहिरात दिली होती; ज्याचे रस्त्यावर फोटोदेखील लावण्यात आले होते. या फोटोची खूप चर्चा रंगली होती. अशातच आता एका क्लासच्या जाहिरातीचा फोटो व्हायरल होतोय; जो पाहून युजर्सही हसत आहेत.