Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच आपण विविध प्रकारचे व्हायरल झालेले व्हिडीओ पाहतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सोशल मीडियावरही निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो आणि पावसासंबंधित अनेक व्हिडीओ, दुर्घटना पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओंमध्ये काही अतरंगी लोक प्रसिद्धीसाठी जीवघेणे स्टंट करताना दिसतात. अनेक जण काही गोष्टी रील, व्हिडीओ बनविण्यासाठी मुद्दाम करतात; तर काही जण नकळत असं काहीतरी करताना दिसतात. असे अनेक प्रकारचे व्हिडीओ आपण आजपर्यंत सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपासून देशभरातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून, काही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता पूर आलेल्या ठिकाणी धबधब्यावर मजा करण्यासाठी जातात. पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा प्रवाह भरपूर असतो, तरीही लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून रील्स बनवतात. यापूर्वी सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुण असं काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण चक्क नदीच्या पुराच्या पाण्यातून पुल ओलांडताना दिसत आहे. यावेळी तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पाण्यातून चालताना दिसत आहे. यावेळी तो किनाऱ्यावर पोहोचताच तिथे उभे असलेले लोक त्याच्या कानाखाली वाजवतात. खरं तर, हा खूप जुना व्हिडीओ असल्याचेदेखील म्हटले जात आहे; जो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shetivadi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: शेवटी राजा तो राजाच; १२ सिंहांनी केला बिबट्याचा पाठलाग अन् पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “वीर धरणावरचा व्हिडीओ आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, “भाऊ फूल फॉर्ममध्ये आहे.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “याला असंच पाहिजे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “त्याला मारलेलं पाहून बरं वाटलं.” तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the young mans stunt in the flooded river netizens are making comments after seeing the video sap