मुंबई महानगरपालिकेत नोकरी हवीये? टायपिंग येत असल्यास, BMC मधील ‘या’ रिक्त पदांसाठी लगेच करा अर्ज

BMC Bharti 2023: पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे.

Jobs In BMC Recruitment 2023 If You Know Typing And 10th Pass Apply For Job Role In Mumbai Mahanagarpalika Check Details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी (फोटो: Pixabay)

BMC Bharti 2023: मुंबई महानगरपालिकेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी) पदासाठी २७ रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांची माहिती, पात्रता निकष व अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊयात.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदे व पात्रता निकष

पदाचे नाव – ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी)

ज्युनिअर स्टेनोग्राफर वृत्तनिवेदक (इंग्रजी) च्या एकूण ९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे इंग्रजी टायपिंगचा वेग ४० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी शॉर्टहॅण्डचा ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव – ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (मराठी)

ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (मराठी) च्या एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे मराठी टायपिंगमध्ये ३० शब्द प्रति मिनिट आणि मराठी शॉर्टहॅण्डचा ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असणे आवश्यक आहे.

  • दोन्ही पदांसाठी MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १८ ते ३८ वर्ष
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १८ ते ४३ वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई-400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ फेब्रुवारी २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.mcgm.gov.in

हे ही वाचा<< नॅशनल हाऊसिंग बँकेत ‘या’ पदांसाठी सुरु आहे नोकरभरती; महिन्याला ३६ हजार ते ५ लाखापर्यंत पगार मिळवण्याची संधी

अधिक माहितीसाठी BMC अधिकृत जाहिरातीची PDF नीट तपासून पाहावी, वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑल द बेस्ट!

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 18:50 IST
Next Story
‘या’ ७ टिप्स बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवतील, परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या
Exit mobile version