अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत. अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत. त्यातच २३ आणि २४ एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडूंना उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचे कारण देऊन रद्द करण्यात आली आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शाह यांची सभा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पोलिसच भाजपाचे कार्यकर्ते, आता आम्ही विष प्यावे का?’ बच्चू कडू यांचा उद्विग्न सवाल

बच्चू कडू यांचा दावा काय?

अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आले आहेत. अमित शाह यांची उद्या सभा होणार असल्यामुळे याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आज बच्चू कडू त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसह येथे आले असताना त्यांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही आमची अडवणूक का करत आहात? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसेच पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडू पोलिसांवरच संतापले. पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालत आहेत? अमित शाह यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी, अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे, त्यांना सभा घेऊ द्यावी, असे बच्चू कडू म्हणाले. मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना मैदानात येऊ दिले नाही.

पोलिसांसमोरच आयोगाच्या परवानगीचं पत्र फाडलं

पोलीस आपले ऐकत नाहीत, हे पाहिल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाने दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले. पोलिसांनी आपल्या गळ्यात भाजपाचा पट्टा घालावा आणि गाडीवर भाजपाचे झेंडे लावावेत, अशीही टीका बच्चू कडू यांनी केले. भाजपाच्या सांगण्यावरून पोलीस काम करत असून आम्हाला मैदानाबाहेर काढले जात आहे, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.

प्रकरण काय आहे?

अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर २१ आणि २२ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. तर बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी परवानगी मिळाली होती. त्यासाठी रितसर पैसेही भरण्यात आले होते. मात्र अमित शाह यांचा दौरा २४ एप्रिल रोजी ठरल्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांना मैदानावर येऊ दिले नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 bacchu kadu attack on union home minister amit shah rally in amravati kvg
First published on: 23-04-2024 at 16:23 IST