अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे तीन दिवस आणि प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना अमरावतीमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी सभा घेण्यास निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली होती. मात्र २४ एप्रिल रोजी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह याच मैदानावर प्रचार सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना आज मैदानाचा ताबा घेण्यासापासून पोलिसांनी मज्जाव केला. आपल्याकडे रितसर परवानगी असूनही पोलीस आपली अडवणूक करत असल्याचा आरोप करून बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन करत पोलीस भाजपाधार्जिण निर्णय घेत असल्याचा आरोप केला.

अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या

Bachhu Kadu amravati rally
अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या
Eknath Shinde Raj Thackeray (1)
“दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ajit pawar
“मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; ‘या’ नेत्याने दिला इशारा
Ravi rana vs Bachhu Kadu
अमरावतीमधील अमित शाहांच्या सभेवरून राडा; रवी राणा म्हणाले, “बच्चू कडू स्वस्तातली…”
Lok Sabha Election 2024
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”
Narayan Rane Uddhav Thackeray
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो”
sanjay raut shinde fadnavis (1)
“अटकेची शक्यता निर्माण झाल्यावर फडणवीस शिंदेंना म्हणाले, तुम्ही…”, संजय राऊतांचा दावा

पोलीसच भाजपाचे कार्यकर्ते

बच्चू कडू आज मंडप उभारण्यासाठी सायन्स कोर मैदानावर पोहोचले असताना पोलिसांनी त्यांना रोखले. तसेच सुरक्षेच्या कारणास्ताव तुम्हाला मैदानावर सभा घेता येणार नाही, असे सांगितले. मात्र परवानगी आणि रितसर शुल्क भरल्यानंतर पोलीस आम्हाला कसे काय रोखू शकतात? असा आरोप बच्चू कडू यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तरी विनापरवानगी सभा घेणे आवडणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमच्याशी वागत असून आम्हाला मैदानाबाहेर काढत आहेत. अमित शाह यांच्या सभेसाठी रितसर परवानगी मिळाली आहे का? याचेही उत्तर पोलिसांनी दिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच पोलिसांनी आता भाजपाचे मफलर (विदर्भीय भाषेत ते दुपट्टा म्हणाले) गळ्यात घालावे आणि आपल्या गाडीला भाजपाचा झेंडावा लावावा, आसा आरोप केला.

आता आमच्या हक्कांसाठी विष प्यावे का?

पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. आम्ही अमित शाह यांच्या सभेला विरोध करत नाहीत. त्यांचे अमरावतीमध्ये स्वागतच आहे. पण आमच्या हक्काचे हिसकावून त्यांन का देण्यात येत आहे? एकप्रकारे आम्हाला स्वतःच्या घरातून बाहेर काढण्याचा हा प्रकार आहे. तसेच पोलीस आता आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या हक्कासाठी आता आम्ही विष प्यावे का? असा उद्विग्न सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

एक लाख लोकांसह मैदानावर धडकणार

२४ एप्रिल रोजी सायन्स कोर मैदानावर प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी प्रचार सभा होणार असल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते गावागावातून निघाले आहेत. ते उद्यापर्यंत याठिकाणी येतील. यामध्ये अनेक दिव्यांग कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. त्या सर्वांसह आम्ही याच मैदानावर धडकणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.