आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयामुळे मुंबईच्या संघाने क्वालिफायरमध्ये स्थान पक्क केलं आहे. तसेच त्यामुळे लखनऊ संघाचा यंदाच्या आयपीएल हंगामातील प्रवास संपला आहे. शुक्रवारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाने २० षटकांमध्ये एकूण १८२ धावा केल्या आणि लखनऊच्या संघाला १८३ धावांचे लक्ष्य दिले. पुढे फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला लखनऊच्या संघातील सर्व खेळाडू १६.३ षटकामध्ये १०१ धावांमध्ये बाद झाले. मुंबई इंडियन्सच्या आकाश मधवालने ३.३ षटकांमध्ये फक्त ५ धावा देत लखनऊ सुपर जायंट्सचे ५ गडी बाद केले. सलग तीन पराभवानंतर पहिल्यांदा मुंबईने लखनऊला धूळ चारली आहे. क्वालिफायर-२ सामना जिंकल्यास पुन्हा एकदा मुंबई विरुद्ध चेन्नई असे चित्र पाहायला मिळू शकते अशी चाहत्यांना आशा आहे.

नवीन उल हकचा आता रोहित शर्मा- सूर्या- कॅमरूनशी पंगा! चिडवत केला ‘हा’ इशारा, Video पाहून फॅन्स म्हणतात, “हिंमत..”

कालच्या महत्त्वपूर्ण सामन्याला दोन्ही संघाचे मालक, समर्थक उपस्थित होते. लखनऊचा मेन्टॉर गौतम गंभीरही तेथे हजर होता. मुंबई इंडियन्सने सामना जिंकल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी चेन्नईमध्ये एकच जल्लोष केला. सोशल मीडियावर या सामन्याशी संबंधित असंख्य मीम्स पाहायला मिळत आहेत. नवीन उल हकचे सेलिब्रेशन, आंब्यांचे फोटो यांपासून ते गौतम गंभीरच्या रिएक्शनपर्यंत या सामन्यातील प्रत्येक गोष्टीवरचे व्हिडीओ, फोटो, मीम्स इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. गौतम गंभीर आणि नीता अंबानी सामन्यानंतर एकमेकांना भेटले. त्यांच्या भेटीच्या फोटोंवरही नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

आणखी वाचा – LSG vs MI: आकाश मधवालने रचला इतिहास, माजी खेळाडू अनिल कुंबळेच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir met nita ambani after mi vs lsg ipl 2023 eliminator in chennai watch netizens hilarious reactions yps
First published on: 25-05-2023 at 10:41 IST