तुमच्यापैकी बरेच लोक कांदा, लसूण खातात. कांदा-लसूण प्रत्येकाच्या आहारात महत्त्वाचा घटक असतो. दररोज या पदार्थांचे सेवन केले जाते. अनेकांना तर त्याच्याशिवाय खाण्याचा आनंद घेता नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक जण कांदा-लसूण खाणे टाळतात. शाकाहारातल्या जैन आणि वैष्णव प्रकारच्या जेवणात कांदा आणि लसूण खात नाहीत. इतरही बर्‍याच घरांत विशेषतः कोणत्याही गणपती, चातुर्मास अशा धार्मिक काळात केलेल्या स्वयंपाकातही कांदा आणि लसूण वापरत नाहीत. आयुर्वेदामध्ये व प्राचीन भारतीय औषध पद्धतींत कांदे आणि लसूण हे अनुक्रमे राजसिक आणि तामसिक पदार्थ मानले जातात, जे उत्कटता व आक्रमकता वाढवतात आणि आळशीपणा आणतात. पण, जर कांदा व लसूण खाल्ले नाहीत, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, या विषयावर आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आहारतज्ज्ञ सांगतात, “कांदे आणि लसणामध्ये सल्फरयुक्त रासायनिक संयुगे असतात; ज्यांना फ्रक्टन्स व डिसल्फाइड म्हणतात. ही संयुगे अन्ननलिकेच्या अस्तरासाठी त्रासदायक ठरू शकतात. विशेषत: ज्यांना छातीत जळजळ किंवा अॅसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता असते. या दोन्ही गोष्टींना आहारातून काढून टाकल्याने काहींच्या छातीत जळजळ होऊ शकते. तर दुसरीकडे काही लोक कांदे आणि लसूण यांच्याबद्दल अतिसंवेदनशील असू शकतात; ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ, अतिसार किंवा पोटात पेटके यांसारखे अस्वस्थता निर्माण करणारे त्रास होतात. त्यांना हे पदार्थ वर्ज्य केल्याने या परिस्थितीत आराम मिळू शकतो.”

(हे ही वाचा : ‘या’ १०० ग्रॅम फळभाजीच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!)

तुमच्या आहारामध्ये कांदे आणि लसूण समाविष्ट आहेत. हे कार्बोहायड्रेट्स आहेत, जसे की साखर आणि फायबर; जे काही लोकांसाठी लहान आतड्यांद्वारे शोषले जात नाहीत. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला संवेदनशील GI ट्रॅक्ट किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि अॅसिड रिफ्लक्स यांसारख्या परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते; ज्यामुळे गॅस, गोळा येणे, अतिसार व बद्धकोष्ठता होऊ शकते.

लसूण आणि कांदा तामसिक जेवणाच्या श्रेणीत आहे. हे पदार्थ गरम मानले जातात. असे म्हटले जाते की, हे पदार्थ खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन कमी-जास्त होते. अशा स्थितीत राग, एक्साइटमेंट्, आळस जास्त येतो. म्हणून पावसाळ्यात हे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.

तसेच हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, कांदे आणि लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि ॲलिसिनचे प्रमाण जास्त असते. हे एक अँटिऑक्सिडंट आहे; ज्यामध्ये रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होणे यांसारखे संभाव्य आरोग्य फायदे आहेत. त्यामुळे ते तुमच्या आहारातून वर्ज्य केल्याने फायदेशीर संयुगे कमीही होऊ शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pros and cons of consuming a no onion garlic diet know from expert pdb
First published on: 11-05-2024 at 17:24 IST