CM Eknath Shinde : राज्यात प्रचारांचा धडाका सुरू असून विविध जिल्ह्यांत, शहरांत जाण्यासाठी रस्ते मार्गे जाण्यापेक्षा हवाई उड्डाणांना प्राधान्य दिलं जातं. तसंच, निवडणूक काळात पैशांचा अपहार होऊ नये म्हणून जागोजागी तपासणी केली जात आहे. तसंच, विविध हॅलिपॅडवरही प्रचारासाठी जाणाऱ्या नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी याप्रकरणी टीका केली. परंतु, आता देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बॅग तपासली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगांची आज तपासणी करण्यात आली. यासंदर्भात एएनआयने व्हिडिओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर आहेत. पालघर दौऱ्यावर असताना त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोलाही लगावला. “माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत. युरिन पॉट नाहीय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> Ajit Pawar : अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगांसह जेवणाचा डबाही तपासला, VIDEO शेअर करत म्हणाले…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी त्यांची बॅग तपासण्यात आली होती. यावरून शरद पवारांनीही टीका केली. त्यानंतर औसा येथील सभेदरम्यानही त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. या दोन्ही दिवशी बॅग तपासल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची तपासणी करण्यता आली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या तपासणीचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की आज मी निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी माझ्या बॅग व हेलिकॉप्टरची नियमित तपासणी केली. मी देखील त्यांना पूर्ण सहकार्य केलं. मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारच्या उपाययोजना स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी आवश्यक आहेत. आपण सर्वांनी कायद्याचा आदर करायला हवा. आपली लोकशाही टिकवण्यासाठी निडणूक आयोगाच्या या प्रयत्नांना सहकार्य करुया.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde bag checking at palghar while visit sgk