मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया

चंद्रकांत दादा पाटील – पुणे

विजयकुमार गावित- नंदुरबार

गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे – सांगली

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत – रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार – हिंगोली

दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

हेही वाचा : मुस्लीम सर्वेक्षणाच्या जीआरनंतर अफवांचं पेव, शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “काही आक्षेपार्ह…”

मागील अनेक दिवसांपासून विरोधकांनी पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं होतं. पालकमंत्री नसल्याने अनेक कामं रखडल्याचाही आरोप करण्यात येत होता. मात्र, आता अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde announce list of guardian minister for maharashtra pbs