Actress urmila kanitkar will be playing major role in marathi serial rnv 99 | अभिनेत्री उर्मिला कानिटकर करणार छोट्या पडद्यावर एंट्री, 'या' मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला | Loksatta

अभिनेत्री उर्मिला कानिटकर करणार छोट्या पडद्यावर एंट्री, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मध्यंतरी ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसली.

अभिनेत्री उर्मिला कानिटकर करणार छोट्या पडद्यावर एंट्री, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री उर्मिला कानिटकर मराठी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. मोजक्याच कलाकृतींमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. मध्यंतरी ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसली. आता पुन्हा एकदा ती मालिकेत पुनरगमन करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मात्र आता लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : क्रूर औरंगजेब, छत्रपती शिवरायांचे बुद्धीचातुर्य अन् आग्र्याहून सुटकेचा थरार; अंगावर काटा आणणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’चा ट्रेलर प्रदर्शित

काही महिन्यांपूर्वी उर्मिलाने या मालिकेतून एक्सिट घेतली. तिने घेतलेली एक्सिट ही खूपच चर्चेचा विषय ठरली. तिने एक्सिट घेतल्याने प्रेक्षक संभ्रमात पडले होते आणि मालिकेतून तिच्या अचानक बाहेर जाण्याच्या कारणांचे अंदाज लावत होते. पण आता याच मालिकेत उर्मिला परत दिसणार आहे.

नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो आउट झाला. या मालिकेच्या नवरात्री विशेष भागात मल्हार आणि स्वराजचा एक भावनिक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या भागात स्वराजची आई आणि मल्हारची पत्नी म्हणजेच अभिनेत्री उर्मिला कोठारेचेही खास सीन असणार आहेत. या व्हिडीओत स्वराज आणि मल्हार समोरासमोर बसले आहेत. उर्मिला मधोमध बसून “स्वरा तू सुरक्षित ठिकाणी आहेस. लवकरच तुम्हा दोघांना एकमेकांची ओळख होईल,” असे स्वराला सांगत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता पुढच्या भागांची उत्सुकता आहे.

मुंबईतल्या सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात याचं शूट पार पडलं आहे. आजवर या मंदिरात कोणत्याही मालिकेचं किंवा सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच तुझेच मी गीत गात आहे मालिकेचं शूटिंग या मंदिरात झालं आहे.

आणखी वाचा : अवघ्या २ महिन्यात उर्मिला कोठारे घेणार ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून एक्झिट, कारण आले समोर

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेद्वारे उर्मिलाने जवळपास १२ वर्षांनी टेलिव्हीजन विश्वात पुनरागमन केले आहे. ती “तुझेच मी गीत गात आहे” या मालिकेच्या सेटवरील धमाल किस्से, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तिने यात वैदेही हे पात्र साकारलं होतं. अनेक वर्षांनी मालिकेत काम करायला फार मजा येत असल्याची प्रतिक्रिया अनेकदा तिने दिली होती. त्यामुळे आता या मालिकेत तिच्या पारतण्याने काय नवा ट्विस्ट येतोय हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अली आणि रिचाच्या लग्नाला हॉलिवूड स्टार्सही लावणार हजेरी; समारंभात पाहुण्यांना फोन वापरता येणार पण…

संबंधित बातम्या

“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
‘हा’ लोकप्रिय भारतीय अभिनेता एलॉन मस्कच्या सहाय्याने घेणार अंतराळात झेप
मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“दोन दिवस मी पुण्यात…” अचानक लाइव्ह येण्यामागे संकर्षण कऱ्हाडेने दिलं कारण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुण्यातील काँग्रेस भवनच्या कार्यक्रमाला शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची दांडी; पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाटय़ावर
‘जीवनशैलीत बदल करण्याची गरज’; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
९ दिवसांत पोलिसांना २ हजारांवर फोन करत दिल्या शिव्या; अटक करताच म्हणाला…
Video: याला म्हणतात किंग कोहलीचा राजेशाही थाट! खणखणीत Six ने साजरं केलं ७२ वं शतकं; हा शॉट गोलंदाजही पाहतच राहिला
Video : पांढरी दाढी, थकलेला चेहरा, विस्कटलेले केस; ‘तू तेव्हा तशी’मध्ये तरुण दिसणाऱ्या स्वप्निल जोशीचा ‘नो मेकअप’ लूक