बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात देखील बऱ्याच चर्चा झाल्या. शिल्पाचा हंगामा २ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. १४ वर्षांनंतर शिल्पाने या चित्रपटातून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत एण्ट्री केली आहे. मात्र, पती राज कुंद्राच्या अटकेमुळे तिच्या चित्रपटावर अनेकांनी टीका केली आहे. आता शिल्पाने प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी विनंती करत एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिल्पाने तिच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. मी योगाचा अभ्यास करते आणि त्यातून मिळणाऱ्या शिक्षणावर माझा विश्वास आहे. “मी योगाचा अभ्यास करते आणि त्यातून मिळणाऱ्या तत्वज्ञानावर माझा विश्वास आहे. आयुष्य एकाच ठिकाणी अस्तित्वात असते आणि ते म्हणजे तुमच्या वर्तमानात. हंगामा २ या चित्रपटात संपूर्ण टीमची मेहनत आहे. हा चित्रपट चांगला बनवण्यासाठी प्रत्येक कलाकारने प्रचंड मेहनत घेतली आहे आणि कोणत्याही इतर गोष्टीचा या चित्रपटावर परिणाम व्हायला नको. म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा मेहनतीसाठी तुम्ही हंगामा २ पाहा. हा चित्रपट पाहताना नक्कीच तुम्हाला आनंद होईल. धन्यवाद. कृतज्ञता. शिल्पा शेट्टी कुंद्रा, अशा आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.,” अशा आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.

आणखी वाचा : “ही त्याच्या कर्मांची शिक्षा,” पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला आणखी एक धक्का

दरम्यान, काल शिल्पाने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केलाय. यामध्ये जेम्स थर्बर या लेखाचं एक वाक्य दिसून येत आहे. “रागात मागे वळून पाहू नका किंवा घाबरुन येणाऱ्या काळाकडे पाहू नका उलट जागरुक राहून याकडे पाहा,” असा या वाक्याचा अर्थ आहे.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हंगामा या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त मीझान जाफरी, प्रणिता सुभाष, राजपाल यादव, आशुतोष राणा, जॉनी लीव्हर आणि परेश रावल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

तर, राज चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. राज पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत नाही. या व्यतिरिक्त राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या व्यवसायाबद्दलचे अनेक प्रश्न टाळत आहे. सोबत मनी ट्रेलच्या संबंधीत प्रश्नांना देखील तो टाळत आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची याचिका केली. यानंतर न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After raj kundra arrest shilpa shetty s first post and request fans to watch hungama 2 dcp
First published on: 23-07-2021 at 22:02 IST