बॉलिवूड चित्रपटांना गेल्या काही महिन्यांमध्ये बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. आमिर खान, अक्षय कुमार यांसारख्या टॉपच्या कलाकारांच्या चित्रपटाचा यामध्ये समावेश आहे. सैफ अली खानचाही ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण या चित्रपटामधील त्याचा लूक व भूमिका यावरून त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. सैफने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसी नाईकचा नवरा पबमध्ये पार्टी करण्यात मग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

‘सीएनबीसी-टीवी १८’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफने म्हटलं की, “बॉयकॉट चित्रपट करणाऱ्यांचा एक वेगळाच वर्ग आहे. मला असं वाटतं की, बॉलिवूडमध्ये एकता नाही. कोणतंही पाऊल उचलण्याची जर आपल्यामध्ये क्षमता नसेल तर बॉयकॉट ट्रेंडचं सत्य कधीच आपल्याला कळू शकत नाही.”

पुढे तो म्हणाला, “जे लोक बॉयकॉट बॉयकॉट बोलतात ते लोक प्रेक्षक असतील असं मला वाटत नाही. मनोरंजन लोकांना आवडतं. लोकांना चित्रपट पाहायला आवडतो. आपल्या देशामध्ये खूप काही करण्यासाठी अधिक वाव नाही.”

आणखी वाचा – रिलेशनशिप, लग्न अन् आता घटस्फोट…; मानसी नाईकच्या बॉक्सर नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

“मुलांना फिरण्यासाठी गार्डनमध्ये घेऊन जाणं किंवा बोटीमधून फिरायला घेऊन जाणं या गोष्टी तुम्ही इथे करू शकत नाही. मनोरंजनाची साधनं आपल्या देशामध्ये मर्यादीत आहेत. त्यापैकीच चित्रपट हे एक आहे.” पण बॉलिवूडमध्ये एकी नसल्याचं सैफचं ठाम मत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan talk about boycott trend in bollywood see details kmd