सलमान खानचा मल्टिस्टारर चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडली आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला तरी अद्याप चित्रपटाला भारतात १०० कोटींचा गल्ला जमवता आला नाही. मात्र, जगभरात चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पाणावलेले डोळे, भांगेत कुंकू अन्…; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेबद्दलची ‘ती’ चूक सुधारली

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. आठव्या दिवशी चित्रपटाची कमाई सर्वात कमी झाली आहे. कमाईचा वेग पाहता चित्रपटाला १०० कोटी कमवणेही कठीण दिसत आहे. मात्र, या विकेंडला चित्रपट चांगली कमाई करेल आणि १०० कोटींचा आकडा पार करेल अशी आशा निर्मात्यांना आहे. सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार ‘किसी का भाई किसी की जान’ ने शुक्रवारी केवळ २ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ९२.१५ कोटींवर गेली आहे.

हेही वाचा- लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेखर सुमनने दिली बायकोला आलीशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. तसेच व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ईदच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan film kisi ka bhai kisi ki jaan day 8 box office collection gross 150 crores world wide collection dpj