बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. १६ जानेवारीला गुरुवारी पहाटे त्याच्यावर हल्ला झाला होता. या घटनेनंतर अभिनेता मोठा चर्चेत आला होता. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात एक व्यक्ती घुसली होती. त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत अभिनेता गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात उपचार कऱण्यात आले. पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफ अली खान घरी परतला आहे. सध्या तो आराम करत आहे. या सगळ्यात आता सर्जरीनंतर सैफ अली खानचे त्याचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचे फोटो पाहायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफ अली खानचा लेकाबरोबरचा फोटो पाहिलात का?

सोशल मीडियावर दिसत असलेल्या या फोटोंमध्ये सैफ अली खान व इब्राहिम अली खानचा लूक लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये सैफ अली खानचा गडद निळ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची पॅन्ट, शूज असा लूक दिसत आहे; तर इब्राहिमने निळा शर्ट व पांढऱ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. या फोटोमध्ये सैफ अली खानच्या मानेवर पांढरी पट्टी दिसत आहे. अरमान(armaandbg)या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.

नुकतीच सैफ अली खान करीना कपूर यांनी पापाराझी व मीडियाला जेह व तैमुरचे फोटो काढू नका, अशी विनंती केल्याचे पाहायला मिळाले. सैफ व करीनाच्या टीमने दिलेल्या निवदेनात पापाराझींना विनंती करत म्हटले होते की, त्यांच्या घराबाहेर थांबून ते येताना-जातानाचे फोटो काढू नका. याबरोबरच जेह व तैमुरचे फोटो काढू नका. मग ते गार्डनमध्ये असले किंवा एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीत असले, ते खेळाच्या ठिकाणी असले तरी त्यांचे फोटो काढू नका. जर ते एखाद्या कार्यक्रमात असले तर त्यांचे फोटो काढू शकता, असे या निवेदनात म्हटले होते.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती बांगलादेशी नागरिक आहे. त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ ​​विजय दास असे आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात तो शिरला होता, असे त्याने कबूल केले आहे. याआधी त्याने कोलकातामधील रहिवासी असल्याचे म्हटले होते. सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. आगामी काळात इब्राहिम अली खान लवकरच ‘दिलेर’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseen photo of saif ali khan with his son ibrahim ali khan after the attack nsp