Koffee With Karan 7 : "डेविड धवन यांना डेट करत होतास का?" विचारलेल्या प्रश्नावर करण जोहर म्हणाला... | koffee with karan 7 show karan johar talk about his relationship and talk about dating with david dhawan watch video | Loksatta

Koffee With Karan 7 : “डेविड धवन यांना डेट करत होतास का?” विचारलेल्या प्रश्नावर करण जोहर म्हणाला….

‘कॉफी विथ करण ७’ शोच्या नव्या भागामध्ये करण जोहरच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा रंगताना दिसणार आहे. या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

Koffee With Karan 7 : “डेविड धवन यांना डेट करत होतास का?” विचारलेल्या प्रश्नावर करण जोहर म्हणाला….
'कॉफी विथ करण ७' शोच्या नव्या भागामध्ये करण जोहरच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा रंगताना दिसणार आहे. या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘कॉफी विथ करण ७’ शोच्या नव्या भागामध्ये प्रेक्षकांना नवं काहीतरी अनुभवायला मिळणार आहे. या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणारा भाग काही खास असणार आहे. विनोदी कलाकार तन्मय भट्ट, दानिश सैत, युट्युबर कुशा कपिला व निहारिका एनएम हजेरी लावणार आहेत. या नव्या भागाचा प्रोमो करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मंचावर उपस्थित असणारी सगळीच मंडळी करणला विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Video : …अन् शोकसभेदरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “आयुष्यच संपलं…”

तन्मय, दानिश, कुशा आणि निहारिका करणला त्याच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारताना दिसणार आहेत. तसेच या नव्या प्रोमोमध्ये करणची बोलती बंद झाली असल्याचं दिसत आहे. ‘कॉफी विथ करण ७’च्या गेल्या भागामध्ये करणने पहिल्यांदाच त्याच्या नात्याबाबत खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिपबाबत चर्चा होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

तुझा एक्स कोण होता?, ती व्यक्ती सुप्रसिद्ध आहे का?, त्या व्यक्तीला आम्ही ओळखतो का? असा प्रश्न या शोमध्ये उपस्थित असणारे करणला विचारतात. वरुण धवनला तुझ्या नात्याबाबत माहित होतं. मग तू डेविड धवन यांना डेट करत होतास का? असा प्रश्न या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारी मंडळी करणला विचारतात.

आणखी वाचा – Video : मराठमोळ्या व्यक्तीच्या घरी जावून करिश्मा-करीनाने झुणका भाकरीवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल

करण या प्रश्नावर अगदी हसत उत्तर देतो की, “मी कधीच डेविड धवन यांना डेट केलं नाही.” इतकंच नव्हे तर आलिया भट्टचीही खिल्ली उडवण्यात आली असल्याचं या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर साकारत असलेल्या शिवा या पात्राला ती ज्याप्रकारे हाक मारते याबाबत तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Anupamaa मालिकेत नवा ट्विस्ट! परितोष बनणार अनुपमाचा शत्रू, स्वतःच्या आईलाच….

संबंधित बातम्या

“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…” जितेंद्र आव्हाडांची अक्षय कुमारच्या लूकवर संतप्त प्रतिक्रिया
तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये
ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन
“तुम्ही मराठीत…” पूनम पांडेने पार्टीत थेट पत्रकारांना विचारला प्रश्न
विकी कौशलला एक्स गर्लफ्रेंडनं नाव न घेता मारला टोमणा, म्हणाली…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक
उत्तर कोरिया: के-ड्रामा, अमेरिकी चित्रपट पाहिले म्हणून विद्यार्थ्यांना भरचौकात मृत्यूदंड; शिक्षा पाहणं स्थानिकांना केलं बंधनकारक कारण…
Maharashtra Karnataka Dispute: “कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर…,” एकनाथ खडसेंचं जाहीर आव्हान
मुंबई : पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक
IND vs BAN 2nd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन