सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील दणदणीत कमाई केली. तर आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
‘गदर २’ या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलीच कामगिरी केली. या चित्रपटाने ४० दिवसांत भारतात ५२०.८० कोटी, जगभरात या चित्रपटाने ६८० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट पुढील महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी म्हणजेच रिलीजच्या ५६ दिवसांनंतर झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी झी5 आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा करार केला आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाचे हक्क पन्नास कोटींना झी5 ला विकले आहेत. तर या चित्रपटाचा पहिला भाग आधीच ओटीटीवर उपलब्ध आहे.
दरम्यान, त्या चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या व्यतिरिक्त उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनीष वाधवा असे अनेक उत्तम कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol and ameesha patel starter gadar 2 will be releasing on ott platform in next month rnv