Dasara film : अजयच्या ‘भोला’ पाठोपाठ आता नानीचा ‘दसरा’ चित्रपट झाला लीक; निर्मात्यांनी उचललं कठोर पाऊल

‘दसरा’चा टीझर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे

nani
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

दाक्षिणात्य अभिनेता नानी सध्या त्याच्या ‘दसरा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नानीने अनेक चित्रपटांतून काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘हिट’, ‘जर्सी’, ‘मख्खी’, ‘पैसा’ यांसारख्या चित्रपटांमधून नानीने अभिनयाचा ठसा उमटवला. नुकताच त्याचा ‘दसरा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या दिवशी तो ऑनलाईन लीक झाला आहे.

‘दसरा’ चित्रपटाचा टीझर आल्यापासूनच चित्रपटाची हवा होती. अनेकांना हा चित्रपट पुष्पासारखा वाटला. छोट्याश्या गावातील एक मुलगा त्याच्या लोकांसाठी संघर्ष करताना दिसला आहे. टीझरमध्ये दमदार डायलॉग ऐकायला मिळाले. मात्र झूमने दिलेल्या माहितीनुसार आता हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचं सांगितलं जात आहे.

Bholaa Movie leaked : अजय देवगणची चिंता वाढली; प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘भोला’ झाला लीक

‘दसरा’चे निर्माते आता यावर कडक कारवाई करणार असे सांगितले जात आहे. काही मीडिया रीपोर्टनुसार ‘ अभिनेता अजय देवगणचा भोला चित्रपटदेखील ऑनलाईन लीक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अजय देवगणचा ‘भोला’ एचडी क्वालिटीमध्ये लीक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर बऱ्याच पायरेट साइट्सवर हा चित्रपट उपलब्ध असल्याचा दावाही काही लोकांकडून केला जात आहे.

दरम्यान ‘दसरा’ चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं असून नानीच्या बरोबरीने कीर्ती सुरेश, संतोष नारायण हे अभिनेतेदेखील दिसणार आहेत. नानीच्या करियरमधला सर्वात हिट चित्रपट हा ठरू शकतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 13:30 IST
Next Story
“मी मुंबईची मुलगी पण…”, काजल अग्रवालने सांगितला हिंदी आणि तेलगू चित्रपटांमधला फरक, म्हणाली, “बॉलिवूडपेक्षा साऊथ..”
Exit mobile version