अभिनेत्री रसिका सुनील ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीं पैकी एक आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत तिने शनायाची भूमिका साकारली आणि ती सुपरहिट झाली. तिचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. या मालिकेत तिने एका विवाहित पुरुषाच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारल्याने तिला प्रेक्षकांकडून अनेकदा खडे बोल ऐकावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांची प्रमुख भूमिका होती. तर रसिका सुनील हिनेही यात महत्वपूर्ण भूमिका साकारली. विवाहबाह्य संबंध यावर या मालिकेची कथा आधारित होती. त्या मालिकेत काम करत असताना रसिकाला चाहत्यांचे विविध अनुभव आले. कोणी तिच्या कामाचं कौतुक केलं, तर कोणी तिचे कान पिळले. आता असाच एक अनुभव तिने सांगितला आहे.

आणखी वाचा : “…म्हणून स्पृहाच्या ऐवजी मला ‘सूर नवा ध्यास नवा’साठी विचारण्यात आलं,” रसिका सुनीलने सांगितलं कारण, जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री?

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “एकदा शुटींग संपल्यावर अभिजीत मला घरी सोडायला आला होता. तेव्हा एक बाई गाडी थांबवून उतरली आणि तिने माझ्या खांद्यावर जोरात मारलं कारण मी अभिजीतबरोबर होते.”

हेही वाचा : ‘सूर नवा ध्यास नवा’चं सूत्रसंचालन रसिका सुनील करणार! म्हणाली, “मी स्पृहाला फोन करून…”

तर आता तिने शेअर केलेला हा मजेशीर अनुभव तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत ते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rasika sunil shares her memory of mazya navryachi bayko serial rnv