अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या टेलिव्हिजनसह रंगभूमीवर जोरदार काम करत आहे. त्याच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कवितेच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अलीकडेच ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ कार्यक्रमाचे काही प्रयोग अमेरिकेत झाले. त्यानिमित्ताने संकर्षण अमेरिकेला गेला होता. यामुळे तो ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमात दिसत नव्हता. पण आता संकर्षण अमेरिकहून भारतात परतला असून ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमात पुन्हा पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात संकर्षणसह परीक्षण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. अमेरिकेहून परतलेल्या संकर्षणला पाहून अमृताची रिअ‍ॅक्शन काय होती? ती काय म्हणाली? जाणून घ्या…

‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम सुरू झाल्यापासून अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी संकर्षण कऱ्हाडेबरोबर मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे अमृता आणि संकर्षणचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. नुकताच अमृताने ( Amruta Khanvilkar ) इन्स्टाग्राम स्टोरीवर संकर्षणबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, “दोन्ही वेळेची भांडी…”

Amruta Khanvilkar And Sankarshan Karhade

अमृता आणि संकर्षणचा मजेशीर व्हिडीओ पाहा…

या व्हिडीओत अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) म्हणतेय, “पाहा तर कोण आलंय? देखो, देखो वो आ गया…आम्ही अमेरिकेहून रिटर्न कृष्ण मागवला आहे. तर संकर्षण तुझा अमेरिका दौरा कसा होता?” त्यावर अभिनेता म्हणतो, “मी छान आहे. खूप भारी दौरा होता.” त्यानंतर अमृता विचारते, “आपल्या चाहत्यांसाठी काही बोलू इच्छितो का? ‘संकर्षण व्हाया अमृता’ पेजच्या माध्यमातून…” संकर्षण अमेरिकन टॉनमध्ये म्हणतो, “मी सगळ्यांचे फक्त आभार मानतो. थँक्यू.” त्यानंतर अमृता हसत-हसत व्हिडीओ बंद करते. दोघांच्या या मजेशीर व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/Amruta-Khanvilkar-8.mp4

हेही वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळीच्या वादावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्टच मत, कोणाची बाजू घेतली? जाणून घ्या…

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर २२ जूनपासून सुरू झाला आहे. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होतो. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सांभाळत आहे. या कार्यक्रमात लहान मुलांचा उत्कृष्ट असा अभिनय पाहायला मिळत आहे.