bhediyan actress kriti sanon shared danced video with madhuri dixit at zhalak dikh la ja spg 93 | "माझं हृदय फक्त तुझ्यासाठी..." क्रिती सेनॉनच्या पोस्टची जोरदार चर्चा | Loksatta

“माझं हृदय फक्त तुझ्यासाठी…” क्रिती सेनॉनच्या पोस्टची जोरदार चर्चा

दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे.

“माझं हृदय फक्त तुझ्यासाठी…” क्रिती सेनॉनच्या पोस्टची जोरदार चर्चा
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलिवूडमध्ये तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फार कमी काळात क्रितीने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. नुकताच तिचा ‘भेडिया’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिची हटके भूमिका असल्याचं दिसून येत आहे. वरुण धवन या चित्रपटात तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने एका व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

क्रितीने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे विशेष म्हणजे या डान्समध्ये तिच्याबरोबर धक धक गर्ल माधुरी दीक्षित झळकली आहे. नुकतीच कलर्स वाहिनीवरील झलक दिख ला जा कार्यक्रमात हजर होती. माधुरी या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे. साहजिकच दोघींनी एकत्र डान्स केला आहे. ‘केवळ एका महिलेसाठी माझं हृदय धडधडत’ असा कॅप्शन तिने या पोस्टला दिला आहे. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

Photos : डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी; ओटीटीवर पाहता येतील ‘हे’ चित्रपट

‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिती आणि वरुण धवन अनेक ठिकाणी गेले होते. यातील ‘ठुमकेश्वरी’ हे गाणे सध्या गाजत आहे. सध्या क्रिती आणखीन एका कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे तिचं नाव अभिनेता प्रभासशी जोडले जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे.

क्रितीने अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. तिने यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. क्रिती मूळची दिल्लीची असून पेशाने ती इंजिनियर आहे मात्र तिने करिअरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 19:18 IST
Next Story
“तू महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ…” समीर चौगुलेने प्रसिद्ध विनोदवीरासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत