मनसेतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी या दीपोत्सवाला उपस्थिती दर्शवली. त्यानंतर मंगळवारी (२५ ऑक्टोबरला) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची टीम या दीपोस्तवामध्ये सहभागी झाली. यावेळी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थवरही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम पोहोचली. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “मेरे आंखों में मत झांको…” नम्रता संभेरावची ‘लॉली’ पाहून सासूबाईंची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अभिनेत्री नम्रता संभेरावने राज ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं की, “माननीय राजसाहेब ठाकरे अजूनही विश्वास नाही बसत आहे कालची दिवाळी संध्या आम्ही ‘शिवतीर्थ’वर साजरी केली. शिवाजी पार्क येथे साहेबांकर्वी दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याचे आम्ही साक्षीदार होतो. हे महाभाग्य ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’च्या टीमला मिळालं याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनपूर्वक आभार. अतिशय अचंबित करणारं राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आणि मौल्यवान गप्पा टप्पा. किती आमच्यातलं होऊन गप्पा मारल्या आमच्यासोबत स्वप्नवत सगळंच.” इतकंच नव्हे तर राज ठाकरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम नियमित पाहतात तसेच या कार्यक्रमाचे पात्र त्यांना तोंडपाठ असल्याचंही नम्रताने सांगितलं.

तसेच निखिल बने, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, सचिन गोस्वामी, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत या सगळ्या कलाकारांनी मनसे दीपोत्सवाला हजेरी लावली. दरम्यान या कलाकारांनी सोशल मीडियावर अमिता ठाकरे, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थला भेट देणं म्हणजे एक स्वप्न होतं असं निखिल बनेचं म्हणणं आहे. पृथ्वीक प्रतापलाही यावेळी आनंद अनावर झाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम मनसे दीपोत्सवासाठी पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra team actors presence in mns deepotsav meet raj thackeray see photos kmd