‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत पोहोचली. तिच्या सहज-सुंदर अभिनयाने तिने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेता शशांक केतकरबरोबर मृणालने ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता मंदार देवस्थळीने केलं होतं. यावेळी वाहिनीचा उत्तम आधार असूनही दिग्दर्शकाने कलावंतांचे पैसे चुकवले असा आरोप मंदार देवस्थळींवर करण्यात आला होता. मृणालसह शर्मिष्ठा राऊत, शशांक केतकर, विदिशा म्हसकर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृणाल दुसानिसला घडल्या प्रकाराबद्दल विचारलं असता, अभिनेत्री सेलिब्रिटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “त्या घटनेबद्दल आता बोलून खरंतर काहीच फायदा नाही. कारण, जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं. मी त्या मालिकेत अतिशय मनापासून काम केलं होतं. त्यामुळे मी थोडीशी हळवी झाले होते. मी फारच नाजूक मनस्थितीत होते कारण, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता.”

हेही वाचा : प्रथमेश परबच्या व्हिडीओवर लोकप्रिय अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “क्षितिजा तुझा नवरा खूप…”

मृणाल दुसानिस पुढे म्हणाली, “कलाकारांचं कसं असतं…काम सुरूये तोपर्यंत त्यांना पैसे मिळत असतात एकदा काम संपलं की, पुढचं काम मिळेपर्यंत सगळं नियोजन करावं लागतं. माझ्या तेव्हा इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नव्हत्या. जेव्हापासून मला कळू लागलं तेव्हापासून माझा खर्च मी करते. तेव्हा माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असूनही मला कुटुंबाला वेळ देता नाही आला. मी व्यवस्थित काम केलं. अशावेळी मोबदला मिळत नाही तेव्हा खरंच वाईट वाटतं. शशांकला त्याने पूर्ण पैसे दिले आता त्याचा फक्त टीडीएस राहिलाय. पण, तुम्ही इतरांना निम्मे तरी पैसे द्यायचे. ते गरजेचे होतं”

हेही वाचा : Video: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच सोडली मुंबई, विमानतळावरील व्हिडीओ आले समोर

“आता यापुढे काम करताना आर्थिक बाबींवर मी आवर्जुन लक्ष ठेवणार आहे. आता मी इतर बऱ्याच प्रोडक्शन हाऊसबद्दल ऐकलंय अशी परिस्थिती सगळीकडे नसते. मला याआधी काम करूनही असा अनुभव कधीच आला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता. मला अनेकांनी आधीच अलर्ट केलं होतं की, इथे काम करू नकोस पण, मी नाही ऐकलं. ही एक गोष्ट सोडली तर, तो उत्तम दिग्दर्शक आहे. माझी पहिली ऑडिशन त्यानेच घेतली होती. यापुढे, त्याच्याबरोबर प्रोडक्शन म्हणून मी काम करू शकणार नाही…मला भीतीच वाटले. पण, याव्यतिरिक्त दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं, तर तो ग्रेटच आहे.” असं मृणाल दुसानिसने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal dusanis shared a shocking experience when a marathi producer did not pay her salary sva 00
Show comments