अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) पहाटे गोळीबार झाला. दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी अभिनेत्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर पाच राउंड गोळीबार केला. या घटनेनंतर अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली. तसेच त्याच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता अभिनेता विदेशात रवाना झाला आहे.

अभिनेता सलमान खान नुकताच विमानतळावर दिसला. तो दुबईला गेला आहे. एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला आहे. सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अभिनेता विमानतळावर येण्याआधी त्याचा बॉडीगार्ड शेरा आला आणि सलमानची वाट पाहत थांबला, त्यानंतर सलमान आला आणि तो दुबईला गेला आहे.

Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

रविवारी झालेल्या गोळीबारानंतर सलमान खान एकदा सुरक्षारक्षकांसह घराबाहेर पडला होता, पण काही वेळातच तो परत आला होता. त्यानंतर आज तो पहिल्यांदाच प्रवास करतोय. तो एका लक्झरी प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी दुबईला गेला आहे.

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”

दरम्यान, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी सागर पाल व विकी गुप्ता यांना सोमवारी गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली होती. नंतर न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणात सहभागी इतर आरोपींचा शोध घेत आहेत.