मुंबई : मुंबई काँग्रेसच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त रविवारी ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ापर्यंत ‘नफरत छोडो, भारत जोडो’ यात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि इतर सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीत नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय शिबीर

हेही वाचा >>> शिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी 

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली आहे. ती मुंबईत येणार नाही. मात्र मुंबई काँग्रेसच्या वतीने या यात्रेचाच भाग म्हणून मुंबईत महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यात येणार आहे.  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या पुढाकाराने गुरुवारी ‘भारत जोडो’ यात्रेसंदर्भात बैठक घेण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Participation shiv sena ncp in bharat jodo yatra rahul gandhi leadership ysh
First published on: 01-10-2022 at 01:35 IST