लोकसत्ता टीम
नागपूर : माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग जे काही बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडी सरकारने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती आणि मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आम्ही त्याचा पर्दाफार्श करु शकलो असा गौफ्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्यावर आरोप सुरू केले आहे मात्र परमवीरसिंग यांनी जे काही सांगितले आहे ते सत्य आहे. मला, प्रवीण दरेकर, गिरीश महाजनासह भाजपाच्या अन्य काही नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी महाविकास आघाडी्च्या नेत्यांनी काही अधिकाऱ्यांना दिली होती. पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास त्यांना नकार दिला. एकदा नाही तर अटकेसाठी चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळाले नाही. यांचे व्हीडीओ पुरावे आम्ही सीबीआयला दिले. आजंही आमच्याकडे अनेक व्हीडीओ आहे. वेळ आल्यास आम्ही ते सर्व टप्याटप्याने समोर आणणार आहे. असे फडणवीस म्हणाले.
आणखी वाचा-Monsoon Update : राज्यातील ‘या’ भागांत जोरदार, तर कुठे हलक्या पावसाची शक्यता…
अनिल देशमुख खोटे बोलत आहेत
अनिल देशमुख एक दिवसाआड वेगवेगळे आरोप करीत असतात. त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. त्यांनी पेनड्राईव्ह म्हणून पुरावा दिला तरी त्यात नेमके काय आहे हे त्यांनी सांगितले नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी परमवीरसिंग याांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. सुशांत सिंह प्रकरणामध्ये बॉलिवूडवर दबाव टाकण्यास सांगण्यात आल्याचा आरोप सिंग यांनी केला. दरम्यान, परमबीर सिंह यांनी थेट मातोश्री आणि सिल्वर ओकचा उल्लेख करत या प्रकरणामध्ये अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
© The Indian Express (P) Ltd