Premium

कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन

अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थानतर्फे गुरुवारी आयोजित विविध कार्यक्रमांनंतर मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला.

girish mahajan assured that a solution cotton rate jalgaon
कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन (संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी प्रश्नासंदर्भात केलेल्या आंदोलनात दोनशे लोकही नव्हते. मी कापसाला चांगला भाव मिळावा, या मागणीसाठी त्यावेळी केलेल्या आंदोलनात १५ हजारांवर लोक सहभागी झाले होते. कापूस दरवाढीविषयी केंद्रीय कृषिमंत्रीही सकारात्मक आहेत, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थानतर्फे गुरुवारी आयोजित विविध कार्यक्रमांनंतर मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या कापसाच्या दराबाबत महाजन म्हणाले की, सुरुवातीला कापसाला प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव होता. त्यानंतर तो १० हजार झाला. दिवाळीदरम्यान नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत गेला. आता कापसाचे भाव प्रतिक्विंटलला साडेसहा ते पावणेसात हजारांपर्यंत आहेत. सुरुवातीला आम्ही कापसाला १२ हजार भाव दिला. नंतर दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेतील परिणाम म्हणा, कापसाचे भाव प्रतिक्विंटलला साडेसहा ते पावणेसात हजारांपर्यंत आले आहेत.

हेही वाचा… बालकांच्या साचेबद्ध उत्तरांमुळे पोलिसांपुढे आव्हान; दानापूर-पुणे एक्स्प्रेस बालक तस्करी प्रकरण

बाजारपेठेतील स्पर्धेमुळेच दर कमी-जास्त होतात, असे सांगत मुंबईमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत कापसाच्या दराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. विदेशात निर्यात करून कापसाची भाववाढ करता येईल का, कापसाला कसा चांगला भाव देता येईल, याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girish mahajan assured that a solution will be found soon regarding the cotton rate in jalgaon dvr

First published on: 02-06-2023 at 12:22 IST
Next Story
बालकांच्या साचेबद्ध उत्तरांमुळे पोलिसांपुढे आव्हान; दानापूर-पुणे एक्स्प्रेस बालक तस्करी प्रकरण