
आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
कलाकार आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतात.
पण बॉलिवूडमध्ये असेही कलाकार आहेत जे अभिनयासोबतच आपल्या डोळ्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं होतं.
परंतु श्रीदेवीच्या डोळ्यांनी चाहत्यांना भूरळ पाडली होती, हे देखील खरं आहे.
श्रीदेवीचे डोळे काळ्या रंगाचे नसून निळ्या रंगाचे होते. काही वेळेस त्यांचे डोळे हिरव्या रंगाचे दिसायचे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखला जातो.
टायगर श्रॉफचे डोळे काळे नसून तपकिरी रंगाचे आहेत.
त्याच्या सुंदर डोळ्यांमुळे तो अधिक आकर्षक दिसतो.
विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचे लाखो चाहते आहेत. अभिनयासोबतच ऐश्वर्याच्या सौंदर्याचेही चाहते दिवाने आहेत.
ऐश्वर्या राय बच्चनचे डोळे देखील निळ्या रंगाचे आहेत.
हुबेहूब ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे स्नेहा उलाल.
ऐश्वर्याप्रमाणेच स्नेहाचे डोळे काळे नसून निळ्या रंगाचे आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी अभिनयासोबतच ओळखली जाते ती तिच्या विशिष्ट रंगाच्या डोळ्यांमुळे.
राणी मुखर्जीचे डोळे तपकिरी रंगाचे आहेत.
सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देणारी कपूर फॅमिलीची लाडकी लेक म्हणजे करिश्मा कपूर.
करिश्माचं सौंदर्य तिच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांमुळे अधिक खुलून दिसतं.
करिश्माप्रमाणेच बेबो म्हणजे करीना कपूरच्या डोळ्यांचा रंगही हलकासा निळा आहे.
करीनाचे डोळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
बॉलिवूडमधील हॅण्डसम हिरो आणि लाखो मुलींचा क्रश असणारा हृतिक रोशन फिटनेसाठीही ओळखला जातो.
तरुणींना प्रेमात पडणारे हृतिकचे डोळे हिरव्या रंगाचे आहेत. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)