-
हिरवा वाटाणा : एक वाटी हिरव्या वाटाण्यामध्ये ९ ग्रॅम प्रोटीन (प्रथिने) असतं. यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी देखील भरपूर प्रमाणात असतात, जे उर्जा निर्माण करतात आणि स्नायूंची झीज भरून काढायला मदत करतात. (Photo Source: unsplash and reference from USDA Food Data Central)
-
पालक : शिजवलेल्या एक वाटी पालकाच्या भाजीत ५ ग्रॅम प्रोटीन असतं. यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात असतात, जे उर्जा देतात आणि शरिराची झीज भरून काढण्यासाठी उपयुक्त असतात. (Photo Source: unsplash and reference from USDA Food Data Central)
-
ब्रोकोली : शिजवलेल्या एक वाटी ब्रोकोलीमध्ये ४ ते ५ ग्रॅम प्रोटीन असतं. तसेच यात व्हिटॅमिन सी, सुल्फोराफेन नावाचे संयुगही असते, जे अँटी-इन्फ्लेमेंटरी आणि अँटी-कॅन्सर गुणधर्मांसाठी ओळखले जाते. (Photo Source: unsplash and reference from USDA Food Data Central)
-
ब्रसेल्स स्प्राउट्स : या भाजीला बेबी कॅबेज (छोटी कोबी) म्हणूनही ओळखलं जातं. कोबीसारखी दिसणारी लहान आकाराची ही भाजी खूप प्रथिने (प्रोटीन) देते. शिजवलेल्या एक वाटी ब्रसेल्स स्प्राउट्समध्ये ४ ग्रॅम प्रोटीन असतं. तसेच यात व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदय आणि रोग प्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त आहेत. (Photo Source: unsplash and reference from USDA Food Data Central)
-
मशरूम : एक वाटी शिजवलेल्या मशरूममध्ये ३ ते ४ ग्रॅम प्रोटीन असतं. पेशींच्या वाढीसाठी मसरूम उत्तम मानले जातात. (Photo Source: unsplash and reference from USDA Food Data Central)
-
अश्वगंधा : एक कप अश्वगंधामध्ये ४ ग्रॅम प्रोटीन असतं, तसेच फायबर्स, व्हिटॅमिन के आणि फोलेट देखील असतात, जे स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि पचन प्रक्रियेच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत. (Photo Source: unsplash and reference from USDA Food Data Central)
फक्त चिकन-मटण नव्हे ‘या’ भाज्यांमध्येही भरपूर प्रोटीन असतं, फिट राहण्यासाठी आहारात समावेश करायलाच हवा
आहारात प्रथिने (Proteins) असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते शरीराचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. पेशींची वाढ करणे, स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिने एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार करतात जे शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया नियंत्रित करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
Web Title: High protein rich vegetables hidden sources for vitamins iehd import asc