-
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सध्या वाद-प्रतिवाद सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आरोप की, १९९३ साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.
-
रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम राज्याचा गृह राज्यमंत्री आहे. त्यामुळे त्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. कदम यांच्या घरात १९९३ साली काय झाले होते, हे शोधण्यासाठी कदम यांची नार्को टेस्ट करावी, अशीही मागणी परब यांनी केली.
-
कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळण्यात आले होते? यासाठी नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत कदम यांनी केलेला दावा धादांत खोटा ,असेही अनिल परब म्हणाले.
-
दरम्यान रामदास कदम यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांना प्रत्युत्तर दिले. अनिस परब खोटे आरोप करत असून मी त्यांना कोर्टात खेचणार आहे, तत्पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस घरात का ठेवण्यात आले, याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
-
मी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत बोलल्यानंतर याला उद्धव ठाकरे का उत्तर देत नाहीत. त्यांचे चेलेचपाटे का बोलत आहेत? अनिल परब यांना मातोश्रीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळाला आहे का? असा प्रतिप्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला.
-
दरम्यान आपल्या पत्नीबाबत केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. १९९३ साली नेमके काय झाले? यावर कदम यांनी सविस्तर भाष्य केले. खेडच्या घरात आग कशी लागली? याची त्यांनी माहिती दिली.
-
कदम म्हणाले, खेडच्या घरात दोन स्टोव्ह होते. तेव्हा स्टोव्हवर जेवण बनवायचो. जेवण बनत असताना माझ्या पत्नीच्या साडीला आग लागली. त्यावेळी मीच पत्नीला वाचवले. पत्नीला वाचवत असताना माझे हात भाजले.
-
कदम पुढे म्हणाले की, पत्नी भाजल्यानंतर पुढील सहा महिने तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. मीदेखील पत्नीची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात होतो. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
-
तसेच सावली बारवरून अनिल परब यांनी केलेल्या आरोपालाही कदम यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आमचा बार शेट्टीला चालवायला दिला आहे. तो डान्सबार नसून तिथे ऑर्केस्ट्रा चालतो. तिथे काम करणारी एक मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती. तिला नंतर कामावरून काढून टाकण्यात आले. तसेच तो बारही बंद करण्यात आला.
पत्नीच्या साडीला आग कशी लागली? अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
Ramdas Kadam explains Fire Incident: ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतल्याचा दावा केला. यानंतर रामदास कदम यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगताना पत्नीबरोबर काय घडले होते, याची माहिती दिली.
Web Title: Ramdas kadam explain how his wife jyoti kadam burns slams anil parab for baseless allegation kvg