BJP leader Gopichand Padalkar participates in apolitical movement of students appearing for competitive exams in Pune Svk 88 ssb 93 | Loksatta

पुण्यात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन, भाजपा नेते गोपीचंद पडळकर सहभागी

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे साष्टांग दंडवत आंदोलन सुरू झाले आहे.

students movement Pune
पुण्यात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन (image – loksatta team/graphics)

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे साष्टांग दंडवत आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन अराजकीय आंदोलन म्हटले गेले, पण या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार हे नेतेमंडळी सहभागी झाल्याने हे खरच अराजकीय आंदोलन आहे का? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा. या मागणीसाठी मागील दोन महिन्यांत हजारो विद्यार्थी एकत्रित येत पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ आणि अलका टॉकीज चौकात आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या दोन्ही आंदोलनांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि राज्य सरकारने विद्यार्थी वर्गाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे, अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली होती. त्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आणि आपल्या भावना मांडल्या. त्यावेळी शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन लावून स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली, मात्र त्यानंतर देखील कोणत्याही प्रकाराचा निर्णय न झाल्याने आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांकडून अराजकीय साष्टांग आंदोलन करण्यात येत आहे.

हेही वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू, अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : टायर्सच्या गोडाऊनला भीषण आग; शेजारील रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलवले

आंदोलन अराजकीय असल्याचे सांगण्यात आले असताना या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले आहेत. हे खरच अराजकीय आंदोलन आहे का ? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:38 IST
Next Story
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू, अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून