post Home Minister despite Ajit Pawar regret NCP executive meeting demand ysh 95 | Loksatta

‘मागणी करूनही गृहमंत्रीपद मिळाले नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवारांची खंत

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गृहमंत्री करावे, अशी मागणी केली. मला उपमुख्यंमत्री करण्यात आल्यानंतरही मी वरिष्ठांकडे गृहमंत्रीपदाची मागणी केली होती.

‘मागणी करूनही गृहमंत्रीपद मिळाले नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवारांची खंत
‘मागणी करूनही गृहमंत्रीपद मिळाले नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवारांची खंत

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गृहमंत्री करावे, अशी मागणी केली. मला उपमुख्यंमत्री करण्यात आल्यानंतरही मी वरिष्ठांकडे गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. देशमुख यांच्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ही जबाबदारी वरिष्ठांनी सोपविली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात व्यक्त केली. गृहमंत्री झालो तर मी कोणाचे ऐकणार नाही, अशी भीती कदाचित वरिष्ठांना वाटत असेल. त्यामुळे मला गृहखाते दिले नसावे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; राज्यातील सर्व मोठी धरणे भरली, पाऊस अंतिम टप्प्यात

हेही वाचा >>> ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंकडे; फडणवीस यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी पुण्यात आली. या बैठकीवेळी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. खासदार  अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या बैठकीवेळी एका कार्यकारिणी पदाधिकाऱ्याने राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर अजित पवार यांनी गृहमंत्रीपद घ्यावे, असे सांगितले. त्यावर बोलताना मागणी करूनही गृहमंत्री पद मिळाले नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> पुण्याची रात्र थंड; किमान तापमान २० अंशांखाली

राज्यात सत्ता आल्यानंतर गृहमंत्रीपदाची मागणी केली, मात्र अनिल देशमुख यांना गृहमंत्री करण्यात आले. अनिल देशमुखानंतर मी पुन्हा गृहमंत्रीपदाची मागणी वरिष्ठांकडे केली. मात्र तेव्हाही दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली. मी ऐकणार नाही, या भीतीपोटीच माझ्याकडे वरिष्ठांनी ही जबाबदारी दिली नसावी, असे अजित पवार यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

हेही वाचा >>> भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेचा खडसेंकडून इन्कार; अमित शहा-खडसे यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

पवार म्हणाले,की मला जे योग्य वाटते तेच मी नेहमी करतो. पक्षाचा कार्यकर्ता चुकीचा वागला, तर त्याला माफ केले जाणार नाही. सर्वासाठी सारखाच नियम आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. मात्र, चुकीचे काम केले तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील हडपसर, वडगावशेरी, पर्वती आणि पुणे कँटोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांनी या वेळी घेतला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; राज्यातील सर्व मोठी धरणे भरली, पाऊस अंतिम टप्प्यात

संबंधित बातम्या

पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
‘तात्या कधी येता, वाट पाहतोय’; अजित पवारांचा मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
पुणे: श्वानाला दगड मारल्याने एकावर कुऱ्हाडीने हल्ला; श्वानमालक अटकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
माणूस नव्हे हैवान! कुत्र्यांच्या नवजात पिल्लांना जिवंत जाळलं आणि पिल्लांच्या आईला…
छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे- किरीट सोमय्या
करीनाच्या धाकट्या लेकाला फुटबॉलची आवड; खेळता खेळतामध्येच…
विश्लेषण : उकळणारा तप्त लाव्हारस पाहण्याचा थरार, जीव धोक्यात घालून केलं जाणारं ‘व्होल्कॅनो टुरिझम’ आहे तरी काय?
‘बेल बॉटम’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप; खुद्द अक्षय कुमारने दिलं स्पष्ट उत्तर